Bombay Dorid Slug found at Harne Beach Dapoli
esakal
दापोली : समुद्राच्या अथांग पाण्यात दडलेली जैवविविधता अधूनमधून किनाऱ्यावर येऊन आपले अस्तित्व दाखवून देते. हर्णेच्या समुद्रकिनारीही अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण आणि रंगीबेरंगी सागरी जीवाची नोंद झाली (First record of Bombay Dorid Slug in Harne) आहे. ‘बॉम्बे डोरिड स्लग’ (Goniobranchus bombayanus) हा सागरी अपृष्ठवंशी जीव हर्णे येथील खडकाळ किनारपट्टीवर आढळून आला असून, हर्णे किनारपट्टीवरील त्याची ही पहिली नोंद असल्याचे समुद्री जैवविविधतेचे अभ्यासक फहाद जमादार यांनी सांगितले.