Ratnagiri : साथ रोगाच्या प्रतिबंधासाठी सर्वेक्षण

राजापुरात रुग्णांचे रक्त नमुने संकलन; नगरपालिकेकडून शहरात औषधासह धूर फवारणी
Ratnagiri
Ratnagiri sakal

राजापूर : वातावरणामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलाचा प्रतिकूल परिणाम होऊन शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये तापसरीसह डेंगीसारख्या साथीचा फैलाव झाला आहे. दिवसागणिक साथीच्या फैलावामध्ये वाढ होत चालली आहे. शहरातील तापसरीसारख्या साथीचा वाढता फैलाव आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिकेने शहरामध्ये औषध आणि धूर फवारणी करण्याला सुरवात केली आहे. आरोग्य विभागाकडून साथीच्या फैलावाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करताना आजारसदृश लोकांचे रक्त नमुने घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कामले यांनी दिली.

दरम्यान, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. यादव यांनी तालुक्याला गुरुवारी (ता. २२) भेट दिली. या भेटीवेळी त्यांनी आरोग्य विभागाशी संवाद साधताना साथींचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, यासाठी तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती डॉ. कामले यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहेत. या प्रतिकूल बदलाचा परिणाम होऊन शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये तापसरीसह अन्य साथींचा फैलाव झाला आहे. तापसरीच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. तापसरीच्या जोडीने डेंगी साथीचाही फैलाव होत असल्याचे बोलले जात आहे.

वेगाने फैलावणाऱ्या या साथींमुळे लोकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागातर्फे शहरामध्ये तातडीने सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले असून संशयितांचे रक्त नमुने संकलित करून ते तपासणीसाठी पाठविण्याची कार्यवाही सुरू झाल्याचे डॉ. कामले यांनी यावेळी स्पष्ट केले. शहरासह ग्रामीण भागामध्येही साथींचा अटकाव करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com