Konkan News I रत्नागिरीत फास्टफूड सेंटरमध्ये सिलिंडरचा स्फोट, मध्यरात्रीची घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

konkan

या स्फोटाच्या आवाजाने उद्यमनगर भाग हादरून गेला.

रत्नागिरीत फास्ट फूड सेंटरमध्ये सिलिंडरचा स्फोट, मध्यरात्रीची घटना

रत्नागिरी : शहरातील उद्यमनगर येथील एका फास्ट फूड सेंटरमधील सिलिंडरचा काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. फास्ट फूड सेंटर बंद असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी शहरातील नाक्यानाक्यावर उभ्या असलेल्या अनधिकृत फास्ट फूड व चायनीज सेंटरचा मुद्दा यानिमित्ताने समोर आला आहे. (Konkan Breaking News)

हेही वाचा: रत्नागिरी : दररोज आंब्याच्या १५०० पेट्या वाशीकडे रवाना

उद्यमनगर येथील फास्ट फूड सेंटर मध्ये रात्री सिलेंडरचा स्फोट झाला. (Konkan News) या स्फोटाच्या आवाजाने उद्यमनगर भाग हादरून गेला. अचानक झालेल्या स्फोटाने एकच गोंधळ उडाला. (Accident News) या स्फोटामुळे लागलेल्या आगीत जिवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. अनेक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Ratnagiri Fast Food Center Gas Spot At Midnight No Injury Accident S

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..