इंग्लंडवासीयांना हापूसची भुरळ; आता वैशिष्ट्येही पोहोचणार थेट परदेशात

एजन्सीकडून रत्नागिरीत आंबाबागांचे चित्रीकरण, निर्यातवृद्धीसह दरवाढीसाठी फायदा
mango
mangoesakal

रत्नागिरी : इंग्लडची बाजारपेठ काही वर्षांपूर्वी हापूससाठी खुली झाली. तेथील तळागाळातील नागरिकांपर्यंत हापूसची महती पोचवण्याच्या उद्देशाने आयातदार तेजस भोसलेंनी पावले उचलली आहेत. हापूसचे झाड कसे असते, यापासून ते फळ काढेपर्यंतची इत्यंभूत माहिती तसेच कर्नाटकचा आंबा आणि हापूसमधील फरक इंग्लडवासीयांना नेमकेपणाने समजावला जाणार आहे. या संबंधीचा व्हिडिओ तेथे दिला जाणार आहे. त्यासाठी मेंगलोरमधील एजन्सीकडून रत्नागिरीतील प्रमुख बागायतदारांच्या मुलाखतींचे, बागांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

हापूसची चव सातासमुद्रापार पोचली असून दरवर्षी हजारो मेट्रिक टनाची निर्यात केली जाते. सर्वाधिक हापूस आखाती देशांमध्ये पाठवला जातो. त्या पाठोपाठ अन्य देशांचा क्रमांक लागतो. इंग्लडवासीयांमध्ये हापूसला प्रचंड मागणी आहे. हापूसची चव, रंग यासह हे फळ लागणारी झाडे, बागांची माहिती यासह बागायतदारांना करावे लागणार कष्ट लोकांपर्यंत पोचवण्यासाठी इंग्लडमधील आयातदार भोसले यांनी एजन्सीमार्फत चित्रीकरण केले आहे. २३ फेब्रुवारीला एजन्सीचे प्रतिनिधी वीटस लासर्डो यांनी रत्नागिरीतील प्रमुख हापूस निर्यातदारांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून मुलाखती घेतल्या. आंबाबागांचे चित्रीकरण केले. यामध्ये अमर देसाई, डॉ. विवेक भिडे, सचिन लांजेकर, गौरव सुर्वे या बागायतदारांचा समावेश आहे.

mango
रत्नागिरीत क्लबवर छापा; पंधरा जण ताब्यात

चित्रीकरणासाठी ड्रोनची मदत

हापूसची चव इंग्लंडवासीयांना भुरळ पाडत असली तरीही त्याची माहिती जाणून घेण्यासाठी अनेक नागरिक उत्सुक आहेत. डोंगरांमध्ये पसरलेल्या विस्तीर्ण बागांच्या चित्रीकरणासाठी ड्रोनची मदत घेण्यात आली. हे व्हिडिओ इंग्लडमधील आयातदार तेजस यांच्याकडे पाठवण्यात येतील. त्यांच्यामार्फत पुढे लोकांना दाखवले जाणार आहेत.

या गोष्टींचे केले चित्रीकरण

झाडांवर आलेला मोहोर
औषधांची फवारणी, फळधारणेसाठी करावयाचे प्रयत्न
आंबा काढण्याचे तंत्र, मंत्र
आंबा भरताना घेण्यात येणारी काळजी
वाहतुकीसाठी वापरली जाणारी यंत्रणा
रायपनिंग, साका ओळखण्यासाठीची यंत्रणा
दर्जेदार फळ निवडण्याची प्रक्रिया

mango
रत्नागिरी पालिकेत एक प्रभाग वाढला

डझनचा दर चांगला

इंग्लंडमध्ये सरासरी डझनला अकरा ते सतरा पौंडदरम्यान दर मिळतो. त्याची भारतीय पैशानुसार नऊशे ते अकराशे रुपयांपर्यंत जाते. कोरोनामुळे गतवर्षी हापूस कमी उपलब्ध झाला होता. त्यामुळे दरही चांगला मिळाला. वाहतुकीची साधने मर्यादित असल्याने खर्चही वाढला होता. यंदाही हेच संकट आहे.

"हापूसची माहिती इंग्लंडवासीयांपर्यंत पोचवण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. निर्यात चालू होण्यापूर्वी ही माहिती व्हिडिओद्वारे देण्यात येणार आहे. त्याचा फायदा नक्कीच निर्यातवृद्धीसह दरवाढीसाठी होईल."

- तेजस भोसले, आयातदार, इंग्लंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com