Jaigad Port Gas Ship
esakal
रत्नागिरी : जयगड बंदरात चौकशीसाठी आणलेले आमिराती गॅसवाहू जहाज उच्च न्यायालयाच्या आदेशाने जप्त करून ३ महिने जेएसडब्ल्यू पोर्टच्या जेटीवर आणले होते. सुरक्षेच्यादृष्टीने हे जहाज हलविण्याबाबत पोर्टने याचिका दाखल केली (Jaigad Port Gas Ship) होती. यावर निर्णय देताना साडेनऊ कोटी भरा नाहीतर जहाजामधील १८०० टन गॅस रिकामा करा, असे आदेश जहाजमालकाला दिले आहेत. मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.