रत्नागिरी : जिल्ह्यात रिक्षाची भाडेवाढ जाहीर

आरटीओकडून कार्यवाही; पहिल्या १.६ कि. मी.साठी ३१ रुपये
rickshaws
rickshawssakal

रत्नागिरी : पेट्रोलचे वाढते दर, रिक्षाची वाढती किंमत लक्षात घेऊन खटुआ समितीच्या आदेशानुसार, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने आजपासून जिल्ह्यात रिक्षाची भाडेवाढ केली आहे. पहिल्या १.६ कि.मी.च्या टप्प्यासाठी ३१ रुपये भाडे निश्चित केले आहे. त्यापुढील प्रत्येक टप्प्यासाठी २०.४९ एवढे भाडे केले आहे. रात्री १० ते ६ या कालावधीसाठी अतिरिक्त भाडे ५० टक्के निश्चित केले आहे. चार वर्षानंतर झालेली ही भाडेवाड आज रात्रीपासून लागू झाली आहे.

रिक्षाचा सुधारित भाडेदर निश्चित केला आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. यामध्ये रिक्षाच्या भाडेदर निश्चिती सुधारणा करण्याबाबत किमान भाडे निश्चित करण्यासाठी ठराव परिचलन पद्धतीने पारित केला. यापूर्वी १. ६ कि.मी. च्या पहिल्या टप्प्यासाठी २७ व पुढील प्रत्येक किमीच्या टप्प्याला १७.

७० पैसे एवढी भाडेदर निश्चित केली होती. ती सुधारित भाडेवाढ २०१८ पासून लागू केली होती. सप्टेंबर २०१८ पासून वाढलेले पेट्रोलचे दर, ऑटोरिक्षाची किंमत, ऑटोरिक्षाचा विमा यांच्या वाढलेल्या किमतीचा विचार घेता नव्याने सुधारित भाडेदर करण्यात आली.

यासाठी खटुआ समिती नेमण्यात आली होती. त्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ऑटोरिक्षाचे भाडेतर निश्चित करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांची १० जूनला बैठक झाली. परिचलन पद्धतीने ऑटोरिक्षा भाडेदर निश्चित केला आहे. रिक्षाचे पहिल्या १.६ कि.मी.च्या टप्प्यासाठीचे भाडे ३१ रुपये एवढे निश्चित केले आहे. त्यापुढील प्रत्येक टप्प्यासाठी २०. ४९ एवढी भाडे निश्चित केले आहे. रात्री १० ते ६ या कालावधीसाठी ५० टक्के जादा भाडे आकारले जाणार आहे. तसेच लगेजसाठी ३ रुपये एवढे भाडे निश्चित केले आहे. आज रात्रीपासून ही भाडेवाड लागू झाली आहे.

एक नजर..

१.६ कि. मी. च्या टप्प्यासाठी भाडे निश्चित ३१ रुपये

त्यापुढील प्रत्येक टप्प्यासाठी भाडे निश्चित २०.४९ रुपये

लगेजसाठी भाडे निश्चित ३ रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com