सायलीने वडिलांची केली स्वप्नपूर्ती; राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायलीने वडिलांची केली स्वप्नपूर्ती; राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना

सायलीने वडिलांची केली स्वप्नपूर्ती; राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : प्रतिकूल परिस्थिती आणि वडिलांच्या इच्छेमुळे मन लावून मैदानावर सराव करणाऱ्‍या रत्नागिरीतील शिर्के प्रशालेच्या सायली कर्लेकरने खो-खो खेळात राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली. मित्राची मुलगी सराव करायला जात असल्यामुळे सायलीच्या वडिलांनी तिला प्रोत्साहन दिले. गेली चार वर्षे कसून मेहनत घेतली त्याचे फळही मिळाले; पण तो आनंद घेण्यासाठी तिचे वडील आज हयात नाहीत; मात्र त्यांचे स्वप्न तिने पूर्ण केल्याचे समाधान कर्लेकर कुटुंबीयांना आहे.

हेही वाचा: अग्रलेख : ‘क्रिप्टो’चा चक्रव्यूह

ठाणे येथे १४ वर्षांखालील महाराष्ट्र संघाची निवड प्रक्रिया झाली. यामध्ये राज्यभरातून ५२ मुले आणि ४६ मुली सहभागी झाल्या होत्या. मुले व मुलींचा प्रत्येकी बारा खेळाडूंचा संघ निवडला आहे. रत्नागिरीतील शिर्के प्रशालेमध्ये आठवीतील सायलीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. ठाणे येथे त्यांचे सराव शिबिर पूर्ण झाले असून, उना (हिमाचल प्रदेश) येथे होणाऱ्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघातून ती रवाना झाली आहे.

गेली चार वर्षे छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर ती नियमित सराव करत आहे. राष्ट्रीय खो-खोपटू पंकज चवंडे यांच्यासह राज्याचे माजी सचिव संदीप तावडे, विनोद मयेकर, प्रसाद सावंत यांचे मार्गदर्शन तिला मिळते. आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही वडिलांनी तिला सरावासाठी प्रोत्साहन दिले. पाचवीमध्ये शिकत असताना छत्रपती शिवाजी क्रीडांणावर सकाळ-संध्याकाळ ती सराव करत आहे. आईनेही स्वतःची जबाबदारी घेऊन तू पुढे जाणार असशील तर सराव कर, असा सल्ला तिला. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने जिद्दीने खो-खो खेळात पाऊल ठेवले होते. दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले, पण त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सायली खेळत राहिली. खेळाप्रती प्रामाणिकपणा पाहूनच आई दिव्या कर्लेकर यांनीही तिला प्रोत्साहन दिले. सायलीने कथ्थकच्या तीन परीक्षाही दिल्या आहेत. राष्ट्रीय स्पर्धेसाठी सायलीला जिल्ह्यातील खो-खो पदाधिकारी, कार्यकर्ते, शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी दिला शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 नोव्हेंबर 2021

एक नजर...

  • ठाण्यात १४ वर्षांखालील महाराष्ट्र संघाची निवड प्रक्रिया

  • शिर्के प्रशालेतील सायलीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

  • ठाणे येथे त्यांचे सराव शिबिर झाले पूर्ण

  • हिमाचल प्रदेश येथे होणार राष्ट्रीय स्पर्धा

  • आर्थिक परिस्थिती बेताची; वडिलांकडून प्रोत्साहन

  • दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन; स्वप्नपूर्तीसाठी खेळत राहिली

"अनेकांनी मला सांगितले होते, खेळायला तिला प्रोत्साहन देऊ नका, पण तिची जिद्द आणि वडिलांची इच्छा म्हणून तिला मी तिला पाठबळ दिले. प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांचे तिला मार्गदर्शन लाभले."

- दिव्या कर्लेकर, सायलीची आई

loading image
go to top