

Konkan Politics : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार निश्चिती संदर्भातीलचे अधिकार हे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्या हाती आहेत.
शिवसेनेच्या शिंदे गटाकडून कोणी इच्छुक नसेल तर निवडणुकीसाठी तयार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ सिंधुरत्नचे सदस्य किरण सामंत यांनी खासगीमध्ये सांगितल्यामुळे या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये पुन्हा चढाओढ सुरू होण्याची शक्यता आहे.
राजापूर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती दीपक नागले यांच्या पक्षप्रवेशानंतर पत्रकारांपुढे किरण सामंत यांनी लोकसभेच्या जागेबाबत वक्तव्य केले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मी सातत्याने प्रयत्न करत आहे. विकासाच्या मुद्द्यामुळे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून शिवसेनेकडे येत आहेत. कार्यकर्त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे किरण सामंत यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात कार्यकर्ते आग्रह धरत आहेत; मात्र, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार घेणार आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून अद्याप कुणाचे नाव पुढे आलेले नाही. कुणीच पुढे आले नाही तर आपण तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे गेले काही दिवस रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरून थांबलेल्या चर्चेला पुन्हा सुरवात झाली आहे. या जागेवर भाजपकडूनही दावा केला होता; मात्र भाजप प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानंतर लोकसभा जागेसंदर्भातील चर्चा थांबली होती. किरण सामंत यांच्या वक्तव्यानंतर ते मैदानात उतरण्याची तयारी करत असल्याच्या चर्चेला पुन्हा सुरवात होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.