esakal | मुंबईकरांच्या परतीसाठी एसटी विभागाची तयारी ; 607 फेर्‍यांचे आरक्षण फुल्ल
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri ST Division  Preparation  konkani people return in mumbai Reservation of 329 rounds online

881 फेर्‍यांचे नियोजन
274 फेर्‍यांचे आरक्षण सुरू
278 ग्रुप बुकिंग

मुंबईकरांच्या परतीसाठी एसटी विभागाची तयारी ; 607 फेर्‍यांचे आरक्षण फुल्ल

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या परतीसाठी रत्नागिरी एसटी विभागाने जय्यत तयारी केली आहे. आतापर्यंत 329 फेर्‍यांचे आरक्षण ऑनलाईन झाले आहे. 278 फेर्‍या ग्रुप बुकिंग अशा 607 फेर्‍यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. 274 फेर्‍यांचे आरक्षण सुरू आहे. अशा एकूण 881 जादा फेर्‍यांचे नियोजन केले आहे. गणपती विसर्जनानंतर परतीसाठी चाकरमान्यांनी एसटीला पसंती दाखवली आहे. दरवर्षी परतीसाठी 1600 हून अधिक गाड्यांचे आरक्षण होते. परंतु यंदा कोरोनामुळे मोठा फटका एसटी महामंडळाला बसला आहे.


कोणताही ई पास लागणार नसल्याने मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी येतील, असा अंदाज होता. परंतु क्वारंटाईनच्या नियमामुळे चाकरमानी कमी संख्येने रत्नागिरीत आले. एसटीने 295 गाड्यांतून 4956 चाकरमानी रत्नागिरीत आले. लॉकडाऊनमुळे मार्च, एप्रिलनंतर गावी आलेल्या व पुन्हा मुंबईत जाऊ न शकलेले चाकरमानी मोठ्या संख्येने पुन्हा मुंबापुरीत जाण्यास सज्ज झाले आहेत. अर्थात एसटीची लाल परी त्यांच्या मदतीला धावून आली आहे. त्यामुळेच 881 हून अधिक गाड्यांचे आरक्षण झाले झाले.

हेही वाचा- समुद्री कचरा बेततोय खलाशांच्या जीवावर -


दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले. ग्रुप बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला. सांगली, कोल्हापूर, सातारा आदी जवळच्या विभागातून जादा गाड्या मागवण्यात आल्या आहेत. सर्व चालक, वाहकांना कोरोनाविषयक नियमांबाबत सूचना देण्यात येत आहेत.
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांकरिता गणेशोत्सवात दरवर्षी 2500 हून अधिक गाड्यांचे नियोजन केले जाते. रत्नागिरी जिल्ह्यात 1500 हून अधिक गाड्या येतात. यंदा कोरोनामुळे या गाड्यांची संख्या चार पटीने कमी झाली आहे. 22 प्रवाशांनाच प्रवास करता येणार असल्याने यात घट झाली. जादा वाहतुकीतून एसटीला उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा- ‘एक गाव एक गणपती’ च्या 48 वर्ष परंपरेच कोकणातील उर्सें गाव -

तारीख, ग्रुप बुकिंग, फुल्ल, बुकिंग चालू, एकूण फेर्‍या

27 ऑगस्ट  9   12  33  46
28 ऑगस्ट  13  71  88  172
29 ऑगस्ट  67  110  65  242
30 ऑगस्ट  65  120  49  234
31 ऑगस्ट  78  11  18  107
1 सप्टेंबर  28  03  08 39
2 सप्टेंबर 26 2 4 32

हेही वाचा- स्वप्नालीच्या स्वप्नांना गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी मिळाली दिशा -

ग्रुप बुकिंगच्या आगारनिहाय फेर्‍या

मंडणगड 35, दापोली- 27 खेड- 13 चिपळूण- 22 गुहागर- 76 देवरुख- 26 रत्नागिरी- 26 लांजा- 19 राजापूर- 34 एकूण 278


संपादन - अर्चना बनगे