Ratnagiri ST GPS Tracking : एसटीचा वेग अन् थांबेही आता रडारवर ‘व्हीटीएस’ अ‍ॅपद्वारे नियंत्रण; ६५५ एसटीवर ‘जीपीएस’ची नजर

VTS App Monitors Bus Speed and Driving Behaviour : रत्नागिरी जिल्ह्यातील ६५५ एसटी बसमध्ये GPS यंत्रणा बसविण्यात आली आहे. VTS अ‍ॅपद्वारे बसचा वेग, अनावश्यक थांबे, वेळापत्रकाचे पालन आणि धोकादायक ड्रायव्हिंगवर अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे.
Ratnagiri ST GPS Tracking

Ratnagiri ST GPS Tracking

esakal

Updated on

रत्नागिरी : जिल्ह्यातील ६५५ एसटी गाड्यांवर अत्याधुनिक जीपीएस (GPS) यंत्रणा बसविण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे आता एसटीचा धावता कारभार आणि चालकांचे वर्तन थेट अधिकाऱ्यांच्या रडारवर आले आहे.

वाहनाचे लोकेशन समजण्यासोबतच गाडी ठरलेल्या वेळेत सुटली किंवा पोहोचली का, कुठे अनावश्यक थांबली, दिवसभरात किती फेऱ्या झाल्या, एवढेच नव्हे, तर चालकाने गाडी विनाकारण भरधाव पळविली का किंवा रॅश ड्रायव्हिंग करून जोरात ब्रेक दाबले का, या सर्व बाबींचा अचूक डाटा आता संकलित केला जात आहे.

या डाटाच्या आधारे थेट कारवाई केली जाणार आहे. सध्या एसटी महामंडळाच्या व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (Vehicle Tracking System) या अ‍ॅपच्या माध्यमातून सर्व गाड्यांचे पूर्ण नियंत्रण अधिकारी वर्गाकडे आहे. या अ‍ॅपवरून दिवसभराची सर्व आकडेवारी व विश्लेषण स्पष्टपणे समोर येते. ज्या चालकांचे ड्रायव्हिंग धोकादायक आढळेल किंवा जे चालक वेळापत्रकाचे पालन करणार नाहीत त्यांना प्रथम समज देऊन आवश्यक ती प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे.

Ratnagiri ST GPS Tracking
Kalyan Robbery : नोकरीवरून काढल्याच्या रागातून ४० लाख लुटले माजी कर्मचाऱ्यासह सहा जण अटकेत

सध्या ही सुविधा केवळ अधिकाऱ्यांच्या देखरेख आणि नियंत्रणासाठी सुरू असली तरी आगामी काळात हे अ‍ॅप सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. बस नेमकी कुठे पोहोचली आहे आणि आपल्या थांब्यावर कधी येणार, याची अचूक माहिती मोबाईलवरच मिळणार आहे. शहरी १० गाड्या सोडल्या तर उर्वरित ६५५ गाड्यांना ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.

Ratnagiri ST GPS Tracking
Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

"जीपीएस प्रणालीमुळे गाड्यांच्या वेळा पाळण्यावर आणि सुरक्षेवर कडक नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. प्रवासादरम्यान अचानक गाडीत तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा ब्रेकफेलसारखी आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास त्याची तत्काळ माहिती नियंत्रण कक्षाला मिळण्यास मदत होत आहे. अनुचित प्रकाराबाबत कठोर पावलेही उचलली जाणार आहेत."

- अश्वजित जानराव, एसटी विभाग नियंत्रक, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com