Kalyan Robbery : नोकरीवरून काढल्याच्या रागातून ४० लाख लुटले माजी कर्मचाऱ्यासह सहा जण अटकेत

Former Employee Allegedly Planned Robbery : चोरीच्या संशयावरून नोकरीवरून काढल्याच्या रागातून माजी कर्मचाऱ्याने साथीदारांच्या मदतीने ४० लाखांची रोकड लुटल्याचा आरोप आहे.
Kalyan Robbery

Kalyan Robbery

esakal

Updated on

कल्याण : चोरीच्या संशयावरून नोकरीवरून काढल्याच्या रागातून माजी कर्मचाऱ्याने साथीदारांच्या मदतीने ४० लाखांची रोकड लुटली होती. या प्रकरणात कल्याण गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली आहे.

कल्याण येथील एका खासगी बॅंकेच्या शाखेत पैसे जमा करण्यासाठी गेलेल्या फारूक अत्तार, त्यांच्या सहकाऱ्याला कल्याण-आग्रा रोडवर दोन दुचाकी चौघांनी पाठलाग करून अडवले होते. दोघांना मारहाण करून आरोपींनी त्यांच्याकडील ४० लाखांची रोकड हिसकावली.

Kalyan Robbery
Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

या घटनेचा बाजारपेठ पोलिस, कल्याण गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सोहेब शेखला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत समीर शेखने कट रचल्याची माहिती मिळाली होती.

लुटीचे नियोजन एजन्सीतील रक्कम बँकेत जमा करण्यासाठीचा नेहमीचा मार्ग समीरला माहिती होता. याच माहितीचा वापर करून साथीदारांच्या मदतीने लुटीचे नियोजन केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Kalyan Robbery
Asian Games 2026: भारताची नारी शक्ती! नेमबाजांनी जिंकलं कांस्य; मनू भाकरला अपयश पण, कबड्डीत महिलांची बाजी

तीन महिन्यांचा पगार थकीत उल्हासनगरच्या क्रांती फूड एजन्सीमध्ये समीर शेख काम करत होता. चोरीच्या संशयावरून नोकरीवरून काढण्यात आले होते. त्याचा तीन महिन्यांचा पगारही थकीत होता. त्यामुळे नोकरी गेल्याच्या रागातून आफताब खान, शहनवाज अन्सारी, सोहेब शेख, मुजाहिद खान शाहीद शेखसोबत कट रचला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com