Konkan coast rain alert news
esakal
रत्नागिरी : रत्नागिरीत बुधवारी (ता. २७) दिवसभर ढगाळ वातावरणामुळे पावसाचे वातावरण (Ratnagiri weather forecast today) होते. त्यात सायंकाळी हलके वारे वाहू लागल्याने समुद्रही खवळलेला आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात मच्छीमारांनीही नौका किनाऱ्यावर घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात २८, २९ आणि ३० मे रोजी तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.