गावागावात जैवविविधता संशोधन ,संवर्धनासाठी उचलले हे पाऊल

Research, Conservation Of Biodiversity In Village : Ratnagiri Marathi News :
Research, Conservation Of Biodiversity In Village : Ratnagiri Marathi News :

राजापूर (रत्नागिरी) : ग्रामीण भागामध्ये मोठ्याप्रमाणात जैवविविधतता असते. मात्र, त्याचे कोणत्याही प्रकारचे संशोधन वा संग्रहित माहिती नसल्याने त्याचे महत्व फारसे कोणाला समजत नाही. त्यांच्या संवर्धनासाठीही उपाययोजना होत नाही. मात्र, आता गावा-गावांमधील जैवविविधततेचे संशोधन व संवर्धन केले जाणार आहे. त्यासाठी गावस्तरावर जैवविविधतता व्यवस्थापन समित्या गठीत झाल्या आहेतशहरी भागासोबतच ग्रामीण भागामध्ये मोठ्याप्रमाणात जैवविविधतता आहे.

गावातील काही जाणकार व्यक्तींनाच त्याची माहिती असते. अनेकजण या जैवविविधततेबाबत अनभिज्ञ असल्याने या जैवविविधततेचे महत्वच समजत नाही. त्यातून, जैवविविधतता अनेकवेळा अज्ञानातून नष्ट केली जातेगावातील ही जैवविविधतता लोकांना समजावी, त्याची नोंद व्हावी आणि त्यानंतर पुढील पिढीच्या उपयोगासाठी त्याचे जतन वा संवर्धन व्हावे, यादृष्टीने जैविक विविधतता कायद्यानुसार गाव स्तरावर जैवविविधतता व्यवस्थापन समित्या गठीत केल्या जात आहेत.

गावची जैवविविधतता खूली हाेणार

ग्रामसभांमध्ये सात सदस्यीय या समितीची निवड केली जात आहे. त्यानंतर, तालुकास्तरीय समिती गठीत केली जात आहेया व्यवस्थापन समित्या नेमक्‍या कोणत्या कारणासाठी गठीत करण्यात आल्या आहेत, त्यांचे कामकाजाचे नेमके स्वरूप काय आहे, ते कशा पद्धतीने होणार आहे आदींसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी काही सामाजिक संस्थांचीही निवड करण्यात आली आहे. या व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून लवकरच गावची जैवविविधतता साऱ्यांसमोर प्रकाशात येणार आहे


लोकजैवविविधता नोंदवही 

"लोक जैवविविधतता नोंदवही' तयार केली जाणार आहे. या वहीमध्ये पीक वनस्पती प्रजाती, फळझाडे प्रजाती, गुरांच्या चाऱ्याचे पीक, तण प्रजाती, पिकावरील कीड, पाळीव प्राणी, गावचे लोकजीवन आणि भूमीरचना, पाणी उपलब्धतता प्रकार, पाळीव प्राणी वनौषधी, पीक प्रजाती, वनस्पती, प्राणी आदी माहितीचा समावेश आहे

 
संकलन होण्याबाबत साशंकता 
जैवविविधतता व्यवस्थापन समितीच्या नेतृत्वाखाली नोंदवहीत समावेश करण्यात येणाऱ्या माहितीचे संशोधन करणाऱ्या तज्ञ व्यक्ती त्या-त्या गावांमध्ये उपलब्ध होण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे या जैवविविधततेचे योग्य पद्धतीने संकलन होण्याबाबत साशंकतता व्यक्त केली जात आहे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com