Rickshaw Driver Dies in Accident Malvan
Rickshaw Driver Dies in Accident Malvanesakal

Malvan Accident : कळपातील माकडाने रिक्षात उडी मारल्याने चालक जागीच ठार; डोक्याला गंभीर दुखापत अन्..

रिक्षात (Rickshaw) माकडाने (Monkey) उडी घेतल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा रस्त्याकडेला उलटली.
Summary

घटना समजताच येथील रिक्षा चालकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली.

मालवण : मालवणहून खैदाच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षात (Rickshaw) माकडाने (Monkey) उडी घेतल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा रस्त्याकडेला उलटली. या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाला. जयराम ऊर्फ बाबजी दिगंबर मसूरकर (वय ५५, रा. खैदा कोळंब) असे त्यांचे नाव आहे.

ही काल सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याबाबत प्रत्यक्षदर्शी गौरव कांबळी (रा. खैदा) यांनी पोलिसांना वर्दी दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सकाळी साडेअकराच्या सुमारास मसूरकर रिक्षा (एमएच ०७ एएच १८६०) घेऊन मालवणहून आडारी मार्गे खैदाच्या दिशेने जात होते. चढावाच्या रस्त्यावर मसूरकर यांची रिक्षा पोहोचली. यावेळी बाजूच्या झाडीतून आलेल्या माकडांच्या कळपातील एकाने मसूरकर यांच्या रिक्षामध्ये उडी घेतली.

Rickshaw Driver Dies in Accident Malvan
Pusesawali Riots : पुसेसावळीत मोठी दंगल; विक्रम पावसकरांच्या अटकेसाठी अल्पसंख्याक बांधव रस्त्यावर, भाजप नेत्यावर काय आहे आरोप?

यामुळे मसूरकर यांचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मसूरकर जागीच ठार झाले. यावेळी तेथून दुचाकीने जाणाऱ्या कांबळी यांनी रिक्षाकडे धाव घेतली. त्यांनी मसूरकर यांचे मेहुणे उमेश मांजरेकर यांना अपघाताची माहिती दिली. यानंतर बाबा मांजरेकर यांच्या रुग्णवाहिकेतून मसूरकर यांना येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

Rickshaw Driver Dies in Accident Malvan
Chandrakant Patil : लोकसभा निवडणुकीत NDA च्या 325 पेक्षा जास्त जागा निवडून येतील; चंद्रकांत पाटलांना विश्वास

मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हवालदार हेमंत पेडणेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटना समजताच येथील रिक्षा चालकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. मसूरकर यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com