RTE : ‘आरटीई’तून ७८२ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश : जिल्ह्यातील ९१ शाळांची नोंदणी ; २५ टक्के जागांसाठी ऑनलाईन प्रक्रिया
Ratnagiri News : यंदा जानेवारीत प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यास ती लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबवण्यात येणारी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया याच महिन्यात सुरू होणार आहे.
782 students set to receive admission under RTE with 91 schools registered for the programSakal
रत्नागिरी : आरटीई प्रवेशप्रक्रियेतील शाळा नोंदणी प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ९१ शाळांमधील ७८२ जागांवर मोफत प्रवेश दिला जाणार आहे.