सान्वीची मदत लाख मोलाची खावुचे पैसे दिले गरजुंना अन्नधान्यासाठी....

sanvi 900 ru Given form social commitment kokan marathi news
sanvi 900 ru Given form social commitment kokan marathi news

साडवली (रत्नागिरी) : कुंडी सारख्या ग्रामीण भागातील शांताराम बने कुटुंब मुंबईत जावून स्थिरावते व नंतर आपल्या तालुक्याच्या विकासात योगदान देते अशा बने कुटुंबातील चौथी पिढी म्हणजे सान्वी रोहन बने हिने खावुच्या डब्यात साठवलेले ९०० रुपये गोरगरीबांसाठी अन्नधान्यासाठी देवुन बने परीवाराचा दातृत्वाचा वसा या चौथ्या पिढीने जपला आहे.ईस्काॅन तर्फे रोहन बने यांनी दुर्बल घटकांसाठी अन्नधान्य दिले यातच सान्वीचे ९०० रुपये जमा केले.

माजी आमदार सुभाष बने यांनी आपल्याला मिळालेले मानधन मुख्यमंञी सहाय्यता निधीसाठी दिले.माजी आमदारांना ६० हजार मिळत असतात.सुभाष बने यांनी सहा महिन्यांचे मानधन जमा करुन आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.जिल्हा परीषद अध्यक्ष रोहन बने यांनी आपण अध्यक्षपदाचा कार्यकाल असेपर्यंत सर्व मानधन मुख्यमंञी सहाय्यता निधीसाठी देण्याचे या आधीच जाहीर केले आहे.

बने परीवाराची चौथी पिढीही दातृत्वाची धनी
माजी जि.प.सदस्य सुरेश उर्फ बारक्याशेठ बने यांनीही लाॅकडाउन काळात अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.बने परीवाराने तालुक्यासाठी सामाजिक बांधिलकीचे दायित्व कायम ठेवले आहे.लहानपणीच आपण समाजासाठी काहीतरी द्यावे ही सान्वी बनेची भावना लोकांना चांगलीच भावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com