कोरोनानंतर आता स्वाइन फ्लू ; रत्नागिरीत ७ जणांना लागण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे मात्र, त्यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याची माहिती प्रांत अधिकारी अविश कुमार सोनोने यांनी दिली.  

खेड  : खेड जवळील भोस्ते गावातील सात जणांना कोरोना संशयित म्हणून कळबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे मात्र, त्यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याची माहिती प्रांत अधिकारी अविश कुमार सोनोने यांनी दिली. 

हे पण वाचा - ब्रेकिंग - कोल्हापुरात सापडला कोरोनाचा दुसरा रूग्ण

भोस्ते  येथे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आल्याने भोस्ते व खेड परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी, इतरांशी बोलताना सुरक्षित अंतर राखावे, घराबाहेर पडू नये, साबणाने नियमित हात स्वच्छ धुवावेत, सर्दी, ताप खोकला असल्यास स्थानिक डाॅक्टर, आशा वर्कर, शासकीय वैदयकीय अधिकारि यांच्याशी त्वरित सम्पर्क साधावा असे आवाहनही कुमार यांनी केले आहे. 

हे पण वाचा -   मन हेलावणारी बातमी ; दोन वर्षांच्या बाळाला झाला कोरोना

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven person has swine flu in ratnagiri