मन हेलावणारी बातमी ; दोन वर्षांच्या बाळाला झाला कोरोना  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 March 2020

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांत आणखी एकाची भर पडली. इस्लामपूर येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे बाळाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 25 झाली आहे. 

सांगली - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत आज एक धक्कादायक आणि मन हेलावून सोडणारी बातमी इस्लामपुरातून हाती आली. इस्लामपूर येथील कोरोनाबाधित कुटुंबातील अवघ्या दोन वर्षे वयाच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला तत्काळ मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण इस्लामपूरसह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांत आणखी एकाची भर पडली. इस्लामपूर येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे बाळाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 25 झाली आहे. 

हे पण वाचा - कोरोना मुक्त गाव करायचा आहे मग करा हे उपाय....

दरम्यान, दोघांचे अहवाल निगेटिव्ह आलेत. आता 25 जणांच्या संपर्कात आलेल्या 337 जणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

तिघांच्या स्वॅपचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. एका व्यक्तीचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित दोघांचे स्वॅप निगेटिव्ह आले आहेत. सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25 झाली आहे. पॉझिटिव्ह व्यक्ती इस्लामपूर येथील त्या कुटुंबाशी संबंधित आहे. 

हे पण वाचा -  ...तर त्या लोकप्रतिनीधींवर होणार गुन्हे दाखल ; जिल्हाधिकाऱ्यांचा धाडसी निर्णय

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मुंबईपाठोपाठ जिल्ह्यात आहे. सहा दिवसांपूर्वी चार रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर पाच आणि दोन अशी रुग्णसंख्या पुढे आली. इस्लामपुरातील एकाच कुटुंबाशी संबंधित आणखी 12 रुग्णांना कोरोना झाल्याने निष्पन्न झाले. त्यात दोन मोलकरणींचा समावेश आहे. संबंधित कुटुंबातील सदस्य हज यात्रेसाठी जाऊन आले होते. त्यामुळे या चार जणांशी संबंधित लोकांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यात कोरोना संसर्गाची आकडेवारी सुरू झाली. सध्या सर्व रुग्णांवर मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona has had a two year old baby in islampur