
Konkan Flood Update : गेल्या दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने काल रात्रीपासून चांगलाच जोर धरला आहे. त्यामध्ये अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पूराचा राजापूर शहरासह ग्रामीण भागाला वेढा पडला आहे. शहरातील जवाहरचौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत पुराच्या पाण्याने धडकदिली आहे. गेल्या चार तासाहून अधिक काळ जवाहरचौकामध्ये ठिय्या मांडलेला पूरस्थिती अद्यापही कायम असून जवाहरचौकामध्ये सुमारे दिड-दोन फूट पाणी होते.