esakal | 'राजकारणाला पूर्णविराम नाही'; शिवसेना नेते पुन्हा सक्रीय होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

'राजकारणाला पूर्णविराम नाही'; शिवसेना नेते पुन्हा सक्रीय होणार?

मी सध्या खासदार नाही; मात्र असे असले तरी मी राजकारणाला विराम दिलेला नसल्याचे सांगून आपले मनसुबे निवृत्त होण्याचे नाहीत.

'राजकारणाला पूर्णविराम नाही'; शिवसेना नेते पुन्हा सक्रीय होणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : शिवसेना नेते आणि माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मी सध्या खासदार नाही; मात्र असे असले तरी मी राजकारणाला विराम दिलेला नसल्याचे सांगून आपले मनसुबे निवृत्त होण्याचे नाहीत, असे सूतोवाच त्यांनी केले.

दापोली येथील कुणबी हितवर्धिनी सेवा संघाच्या मुंबईतील शिवसेना भवन येथे झालेल्या मेळाव्यात श्री. गीते बोलत होते. आपण स्वतः कुणबी हितवर्धिनीचे सभासद झालो असल्याचे सांगत त्यांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याची संस्थाचालकांना सूचना व आवाहन केले. रायगड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर काही दिवस शांत असलेले गीते यांनी आपण पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

दापोली, खेड, मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे कुणबी भवन उभारणीसाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही श्री. गिते यांनी दिली आहे. आमदार योगेश कदम म्हणाले की, रामदास कदम आणि अनंत गीते यांच्या सहकार्याने कुणबी समाजाच्या स्वाभिमानासाठी दापोलीत कुणबी भवन उभारण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून, कुणी कितीही आडवे गेले तरी आपण कुणबी भवन उभारूनच दाखवू.

हेही वाचा: उल्हासनगर हादरलं! पडक्या घरात डांबून १४ वर्षीय मुलीवर अत्याचार

या मेळाव्यास संस्थाध्यक्ष उन्मेश राजे, संस्था सचिव सुनील पवार, जिल्हा परिषद सदस्य अनंत करबेले, कुणबी समाजोन्नती संघाचे दापोली तालुका प्रतिनिधी आणि दापोली तालुका मुंबई शिवसेनेचे सचिव नरेश घरटकर, कुणबी समाजोन्नती संघ शाखा दापोली मुंबईचे माजी अध्यक्ष आणि दापोली तालुका कुणबी पतपेढीचे माजी अध्यक्ष रमेश काटकर, शिवसेना दापोली तालुका मुंबई संघटक चंद्रकांत शिगवण, तालुका उपसंघटक विजय ठोंबरे, माजी उपसभापती अनंत बांद्रे, उपतालुकाप्रमुख गुणाजी गावणूक आदी उपस्थित होते.

हेही वाचा: 700 वर्षांची परंपरा जपणार 'कोकणातलं' गाव

loading image
go to top