Gram Panchayat Results : मंडणगडातील ग्रामपंचायतींवर सेना वर्चस्वाचा दावा ; राष्ट्रवादीची पिछेहाट

सचिन माळी
Monday, 18 January 2021

सुरक्षा व कोरोना नियमावलीचे पुरेपुर पालन करुनच मतमोजणी प्रक्रीया पार पाडण्यात आली.

मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड तालुक्यातील मतदान झालेल्या 13 व 2 बिनविरोध ग्रामपंचायतीचे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 11 ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित करीत बाजी मारल्याचा दावा केला असून निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे. त्यात गोठे व सावरी या ग्रामपंचायती यापुर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. मंडणगड तहसिल कार्यालयात तहसिलदार नारायण वेगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व चोख पोलीस बंदोबस्तात अत्यंत काटेकोरपण मतमोजणी प्रक्रीया पार पाडण्यात आली. 

निकालाचे ठिकाणी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून मंडणगड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरिक्षक सुशांत वराळे व बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक उत्तम पिठे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरक्षा व कोरोना नियमावलीचे पुरेपुर पालन करुनच मतमोजणी प्रक्रीया पार पाडण्यात आली. याकामी नायब तहसिलदार संजय भिसे, मंगेश आंबेरकर, अनिल जाधव यांच्यासह तेरा ग्रामपंचायतींचे निवडणुक निर्णय अधिकारी व महसुल विभागाचे सर्व कर्मचार्यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा - बंडखोरांना धोबीपछाड करत शिवसेनेची सत्ता कायम राखली

ग्रामपंचायत निहाय विजयी उमेदवारांची नावे व मिळालेली मते 

घोसाळे -

 • रजनी घोसाळकर (184) 
 • साक्षी शेडगे (185)
 • मनोज पवार (91)
 • रविंद्र जाधव (79)
 • नारायण भुवड (92)

भोळवली -

 • मयुरी पाडेकर (168)
 • सारिका सुगदरे (169)
 • पुजा लांबे (89) 
 • संजना राणे (95)
 • रंजीत कासारे (121)

शिरगाव -

 • अनिल नाडकर (286)
 • सुप्रिया धोंडगे (316) 
 • रचना निगुडकर (290) 
 • दिपाली धामणस्कर (339) 
 • आस्मी कदम( 347)
 • गणेश पेंढारे (259)
 • विश्वनाथ सावंत (238)
 • वर्षा सिनगारे (243) 

पालघर -

 • बशीर कुडुपकर (223) 
 • सायली जाधव (232) 
 • साक्षी खांडेकर (231) 
 • दिपीका भोसले (140) 
 • बाबूराव जाधव (121) 
 • सुभाष शिरवणकर (140)

 जावळे -

 • शंकर खेराडे (178) 
 • दिक्षा गोठल (189) 
 • समृध्दी चोरगे (190) 
 • महेंद्र रटाटे (221) 
 • वैभव भानसे (156) 
 • राजेश्री रटाटे (157)

कादवण -

 • राजेंद्र सोंडकर (71) 
 • पुजा मोरे (72) 
 • अस्मिता सोंडकर (71) 
 • उषा शिंदे (76)   
 • उमरोली -
 • वसंत अबगूल (315) 
 • सुरेखा नटे (388)  
 • स्नेहा बोर्ले (402) 
 • हसरत खोपटकर (341) 
 •  

म्हाप्रळ -

 • अजहर मुकादम (194) 
 • फौरोजा पलनाईक (199) 
 • शाहिदा पलनाईक (197) 
 • दाऊद मुकादम (155) 
 • संध्या धाडवे (181)
 • तब्बसुम म्हाळुंगकर (158) 

हेही वाचा - Gram Panchayat Results : सावर्डेत पुन्हा एकदा आमदार निकम यांची सत्ता

 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena win election in mandangad ratnagiri lose rashtrawadi party