
विषारी द्रव पाजून पतीचा खून; आजाराने गेल्याचा बनाव, पत्नीसह तिघांवर गुन्हा
esakal
Shocking Crime News : उत्तर प्रदेशातून कामानिमित्त येथे आलेल्या जोडप्यातील पत्नीने पतीला विषारी द्रव पाजून खून केल्याची तक्रार झिरो नंबरने ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी संशयित पत्नीसह दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पतीचा आजारपणात मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. तक्रारदार यांची सून (नाव माहिती नाही), मनीराम कल्लूराम (वय ४५), मनीराम याची पत्नी (नाव माहीत नाही, वय ४०, रा. बरसोला कला, तिकोनियॉ, जि. खिरी, उत्तर प्रदेश) अशा तिघा संशयितांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. ही घटना २० जूनला घडली आहे.