बैठकिला हजर न राहिल्याने शिवसेनेकडून चार नगरसेवकांना कारने दाखवा नोटीस 

रूपेश हिराप 
Wednesday, 16 September 2020

सावंतवाडी पालिकेची सभा १० सप्टेंबर रोजी झाली. या सभेत सत्ताधारी भाजपने बीओटी तत्वावर मॉल उभारण्याचा विषय ठेवला होता.

सावंतवाडी - येथील नगरपालिकेच्या मासिक बैठकीला व्हिप बजावुनही गैरहजर राहिलेल्या चार जणांना शिवसेनेकडून आज कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तशी माहीती जेष्ठ नगरसेविका तथा गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी सांगितले. 
नोटिस बजावण्यात आलेल्यांमध्ये  शिवसेनेच्या दोन तर एक अपक्ष आणि एका भाजपच्या  नगरसेवकाचा समावेश आहे. 

पक्षाच्या विरोधात जाणाऱ्या विरोधात शिवसेना भवनातूनच आदेश आल्यानंतर याबाबतचे आक्रमक पाउल उचलण्यात आल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले. 

सावंतवाडी पालिकेची सभा १० सप्टेंबर रोजी झाली. या सभेत सत्ताधारी भाजपने बीओटी तत्वावर मॉल उभारण्याचा विषय ठेवला होता. पालिकेचे नुकसान करणारा आणि जनहितविरोधी निर्णय असल्याने या विषयाच्या ठरावाला विरोध करण्यासाठी गटातील सात नगरसेवकांना सभागृहात उपस्थित राहून विरोध करण्यासंदर्भातील व्हीप गटनेत्या या नात्याने अनारोजीन लोबो यांनी बजावला होता. गटातील उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, सुरेंंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, दीपाली सावंत, आनंद नेवगी, बाबू कुडतरकर यांना व्हीप बजावण्यात आला होता. यावेळी आनंद नेवगी यांनी स्वतः व्हिप नस्वीकारल्याने त्यांच्या घराच्या दरवाज्यावर व्हिप बजावण्यात आला होता.

 यापैकी शुभांगी सुकी, दिपाली सावंत, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोलगावकर भाजपाचे नगरसेवक आनंद नेवगी हे सभेला उपस्थित राहीले नव्हते.  त्यामुळे या चौघांना आज पक्षाच्या वतीने सभेला गैरहजर का राहीला याबाबतचे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले. तर घरात कोरोना रूग्ण असल्याने सुरेंद्र बांदेकर, माधुरी वाडकर, आॅनलाईन सभेसाठी तयार होते. 

परंतु आॅफलाईन सभा झाल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली नाही.  सुकी तसेच सावंत यांनी लोबो यांच्याकडे आजारी असल्याबाबत अर्ज दिला होता, असे असताना त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. कोरगावकर, नेवगी हे भाजपवासी झाले आहेत मात्र गट स्थापन करतांना गटाबरोबर असल्याने या दोन नगरसेवकांना व्हीप लागू होतो. तरीही या दोन नगरसेवकांनी व्हीपचे उल्लघंन केल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची  शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत लोबो यांना विचारले असता त्या म्हणाल्या, आम्ही अनुपस्थीतीत असलेल्या सर्व नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहोत. हे त्याचवेळीच स्पष्ट केले होते. याबाबतचे पक्षांकडून आदेश प्राप्त होताच आज त्यांना नोटीशी बजावण्यात आल्या. त्यांनी समर्पक उत्तरे पक्षाला दिली तर त्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. पण व्हीपचे मुद्दामहून कोण उल्लघंन करत असेल तर त्यांच्यावर पक्ष निश्चीत अशी कारवाई करणार आहे. 

हे पण वाचा -  लाॅकडाऊनच्या काळात तब्बल एवढ्या मुलींनी सोडले घर 

नोटिशी बजावण्यात येणाऱ्या शिवसेनेच्या दिपाली सावंत व शुभांगी सुकी यांनी आपण आजारी होतो असे सांगितले होते. तर याबाबत सुकी यांनी आपला तसे पत्रही मला दिले होते मात्र नोटिशीला तसे उत्तर त्यांनी देणे आवश्यक असल्याचेही लोबो यांनी सांगितले.

हे पण वाचा - गप्प राहा, शहराचा विकास करा, अन्यथा कारनामे उघड करू - लोबो  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: show notice to four corporators to sawantwadi municipal corporation