Shrivardhan BJP president arrest news
esakal
श्रीवर्धन : मुंबई महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून तरुणांकडून पैसे घेतल्याचा आरोप श्रीवर्धन तालुका भाजपचे अध्यक्ष तथा माजी सरपंच आशुतोष अंकुश पाटील यांच्यावर (Shrivardhan BJP president arrest news) आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी गुरुवारी (ता. २६) सायंकाळी त्यांना दिवेआगर येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.