esakal | रत्नागिरीत 'या' घटनेमुळे ग्रामस्थांवर आली डोक्याला हात लावण्याची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

side effects of cyclone on education building in ratnagiri

जिल्हा नियोजनच्या आगामी बैठकीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहीले आहे 

रत्नागिरीत 'या' घटनेमुळे ग्रामस्थांवर आली डोक्याला हात लावण्याची वेळ

sakal_logo
By
सचिन माळी

मंडणगड ( रत्नागिरी ) : निसर्गचक्री वादळाच्या तडाख्याने मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमातींचे मोठे नुकसान झाले. यादरम्यान रत्नागिरी जिल्हा परिषदेने निधीच्या उपलब्धतेनुसार तालुक्यात नुकसान झालेल्या प्राथमिक शाळांचे दुरुस्ती करण्याकरिता अग्रक्रम देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. सप्टेंबर महिन्यापासून शाळांचे कामकाज सुरु करण्याचे संकेत मिळत असताना वादळात नुकसान झालेल्या शाळांच्या दुरुस्तीकरिता अजुनही जिल्हा परिषदेकडून निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही.

हेही वाचा - यावर्षी चिपळूणात दिसणार नाही दहीहंडीचा थर...

निसर्गचक्री वादळामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 134 शाळांचे 1 कोटी 83 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. याचबरोबर तालुक्यातील माध्यमिक खाजगी मालकीच्या 24 शाळांच्या इमारतीचे 1 कोटी 45 लाखांच्या नुकसनीचे पंचनामे करण्यात आले आहेत. शाळांच्या एकूण नुकसानीचा आकडा 3 कोटी 28 लाख रुपये इतका आहे. शाळांची छप्परे, इमारतींच्या भिंती, शैक्षणीक साहीत्याचे तसेच वर्ग खोल्यांमध्ये पाणी गेल्याने संगणक, दुरचित्रवाणी संच, डिश यांचेही नुकसान झाले. 

जुन महिन्यात शैक्षणिक सत्र सुरु होईल म्हणून जमेल त्या पध्दतीने छ्प्परांची तात्पुरती दुरुस्ती करण्याचे आदेश शिक्षण विभागाने संबंधित शाळांतील शिक्षकांना दिले होते. त्यामुळे शिक्षकांनी ग्रामस्थांच्या मदतीने शक्य होईल तितक्या  छप्परांची शाकारणी केली आहे. इमारतीच्या कौलावर शिक्षक व ग्रामस्थांनी आपल्या खर्चाने प्लास्टीक व ताडपत्री टाकून पाणी गळती थांबवण्यावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

वादळाने नुकसान झालेले शाळांच्या भिंती व छप्परांचे पक्के काम करुन घेणे गरजेचे आहे. त्यासाठी निधीचे आवश्यकता आहे. कामांच्या आवश्यकतेनुसार संबधित शाळांतील शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून दुरुस्तीचे प्रस्तावही जिल्हा परिषदेकडे सादर केले आहेत. या संदर्भातील अग्रक्रमांच्या कामांची यादीही जिल्हा परिषदेने तयार केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र प्रलंबीत कामांना तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हा परिषद कमी पडत असल्याने सार्वजनीक संपत्ती असलेली जिल्हापरिषदेची मालमत्ता आजही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत ताटकळत पडली आहे.

हेही वाचा -  बाप्पाच्या उत्सवासाठी चाकरमान्यांना असे करावे लागणार सुट्ट्यांचे नियोजन...

नुकसानग्रस्त झालेल्या शाळांच्या दुरुस्तीकरिता रत्नागिरी जिल्हा परिषदेने 31 जुने 2020 पर्यंत निधी उपलब्ध करुन देत शाळा दुरुस्ती करण्यात येतील असे घोषीत केले होते. मात्र निधीअभावी ऑगस्ट महिन्याचे दुसऱ्या आठवड्यातही तालुक्यातील सर्वच शाळांची दुरुस्ती रखडली आहे. परिणामी पदरचे पैसे खर्च केलेल्या शिक्षक व ग्रामस्थांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनच्या आगामी बैठकीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहीले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

loading image