सिंधुदुर्गात निर्बंध शिथिल; पण...

sindhudurg collector tell the lockdown rules
sindhudurg collector tell the lockdown rules

सिंधुदुर्गनगरी - "मिशन बिगीन अगेन' अंतर्गत उद्यापासून (ता.1) जिल्ह्यात काही नियम शिथिल केले आहेत; मात्र लॉकडाउनचा कालावधी 31 ऑगस्टपर्यंत वाढविल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिली. 

यापूर्वी परवानगी दिलेली दुकाने, सेवेची ठिकाणे सुरू राहणार आहेत. जिल्ह्याअंतर्गत बससेवा जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेने, सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण व स्वच्छता विषयक उपाययोजनांच्या अधिन राहून सुरू राहतील. जिल्हा बंदी कायम असून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पूर्वी प्रमाणेच निर्बंध लागू राहतील. जिल्ह्यातील बाजारपेठा, दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या कालावधीत सुरू राहतील, मॉल आणि व्यापारी संकुले दिनांक 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील. यामध्ये नाट्यगुहे, प्रेक्षागृहे (थिएटर्स) फुड कोर्ट व उपहारगृहे यांचा समावेश नाही.

तथापि मॉलमधील उपहारगृहातील स्वयंपाकगृह फक्त घरपोच सेवेसाठी सुरू राहील. लग्न समारंभ, खुली जागा, लॉन, वातानुकुलीत नसलेले हॉल 23 जूनच्या निर्बंधासह चालू राहतील. मोकळ्या मैदानावरील व्यायाम निर्बंधासह सुरू राहतील. वर्तमान पत्राची छपाई, वितरण हे घरपोच सेवेसह सुरू राहील. शैक्षणिक संस्थांची कार्यालये, कर्मचारी ( विद्यापीठे, महाविद्यालय, शाळा) शिकविण्याव्यतिरिक्त अशैक्षणिक कामकाज जसे ई-साहित्याचा विकास, उत्तपत्रिकाची मुल्यांकन, निकालाची घोषणा यासाठी सुरू राहतील. सलुन, ब्युटीपार्लस, स्पा दुकाने राज्य शासनाच्या 25 जूनच्या आदेशाप्रमाणे सुरू राहतील. गोल्फ कोर्स, आऊड डोअर फायरिंग रेंज, जिमनॅस्टिक, टेनिस, मैदानी बॅडमिंटन व मल्लखांब या सारख्या मैदानी खेळांना दिनांक 5 ऑगस्टपासून समाजिक अंतर, निर्जंतुकीकरण याच्या अधिन राहून सुरू राहतील; मात्र जलतरण तलाव चालविण्यास परवानगी असणार नाही. 

काही महत्त्वाच्या सूचना 
दुचाकीवर दोन व्यक्ती मास्क व हेल्मेटसह, तीन चाकीमध्ये तीन व्यक्ती व चार चाकी वाहनामध्ये चार व्यक्ती प्रवास करू शकतील. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, प्रवासा दरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीमधील अंतर किमान 6 फूट ठेवावे. दुकानात ग्राहकांची संख्या एकावेळी 5 पेक्षा जास्त असणार नाही व योग्य त्या सामाजिक अंतराचे पालन केले जाईल. गर्दीचे कार्यक्रम, संमेलन, मेळावे, परिषदांना बंदी राहील. विवाहास 50 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नसेल. अंत्यविधीसाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी धम्रपानास बंदी आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com