दिलासादायक बातमी ; सिंधुदुर्गमधील 'त्या' रूग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह 

sindhudurg corona positive report negative
sindhudurg corona positive report negative

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाला आज जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी या रुग्णाने डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तुर्तास सिंधुदुर्गात एकही पॉझिटीव्ह रूग्ण नाही. जिल्ह्यात नव्याने चार व्यक्तींचे नमूने कोरोना तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले आहेत. तसेच पाच रुग्ण नव्याने आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण २० रुग्ण आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. तर २८ दिवसांचे क्वारंटाइन संपल्याने नव्याने आठ व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे. अशाप्रकारे ९३ व्यक्तींना २८ दिवसांचा क्वारंटाइन संपल्याने आतापर्यंत घरी सोडले आहे.

दरम्यान, संबंधित पॉझिटीव्ह रूग्ण मेंगलोर एक्सप्रेसने प्रवास करून मुंबईतून जिल्ह्यात आला होता.  या रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे 26 मार्च रोजी निदर्शनास आले होते. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याच्यावर उपचार सुरू केले होते. त्यानंतर 14 दिवसांनी त्याचा स्वॅब घेऊन पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याचा अहवाल निगेटीव्ह आला. त्याचे 24 तासाच्या आंतराने घेतलेले दोन्ही नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यास आज सामान्य रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, संजय पडते आदींसह रुग्णालयातील कोवीड – 19 वॉर्डमधील कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com