सिंधुदुर्ग जिल्ह्याला तब्बल 181 अहवालांची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

ई-पास मिळविताना नागरिकांना अडचणी येऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक सुरू करत नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

ओरोस :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांतील एकही अहवाल शुक्रवारी मिळाला नाही. परिणामी प्रलंबित अहवालांची संख्या 181 झाली आहे. आज नव्याने 33 नमुने पाठविले आहेत. ई-पास मिळविताना नागरिकांना अडचणी येऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक सुरू करत नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. 

परराज्यातून व राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून सिंधुदुर्गात दोन मेपासून आजअखेर एकूण 34 हजार 821 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. खारेपाटण चेकपोस्ट येथून 24 हजार 601, फोंडा - 1 हजार 849, करुळ - 3 हजार 301, आंबोली - 1 हजार 428, बांदा - 1 हजार 561, दोडामार्ग - 707 व्यक्तींनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे. जिल्ह्यात सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी व उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे स्वॅब घेण्याची व्यवस्था आहे. 

हे पण वाचा - मजुरांसाठी अनेक धावले मुक्यांसाठी कोणी नाही... -
या आहेत हेल्पलाईन 
जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे ई-पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेद्वारे नागरिकांना पास मिळण्यास काही अडचणी असल्यास त्यासाठी श्‍याम लाखे - 9423301919, राजेश्‍वर राठोड - 9673564496, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, सामान्य शाखा दूरध्वनी क्रमांक 02362-228608, आस्थापना शाखा 02362- 229000 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

वस्तुस्थिती
पालकमंत्री उदय सामंत जिल्ह्यातील कोरोना तपासणी अहवाल सहा तासांत मिळत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगत आहेत; मात्र शुक्रवारी जिल्ह्यात एकही तपासणी अहवाल प्राप्त झालेला नाही. यात 19 ला पाठविलेल्या अहवालांचा समावेश आहे. 

हे पण वाचा - राजापुर तालुक्यात एकाच कुटुंबातील दोघांना कोरोना... -

जिल्ह्याची स्थिती 

 •  कोरोनाबाधित ....8 
 •  सध्या उपचार घेणारे.....3 
 •  कोरोनामुक्त झालेले......5 
 •  एकूण क्वारंटाइन......1560 (306 ने वाढ) 
 •   पैकी संस्थात्मक क्वारंटाईन....407 
 •   तपासणीसाठी पाठविलेले नमुने...1261 
 •  अहवाल आलेले.....1080 
 •  शुक्रवारी पाठविलेले नमुने...33 
 •  प्रलंबित अहवाल......181 
 •  आयसोलेशन कक्षात दाखल.....68 (37 ने घट) 
 •  दिवसभरात तपासणी झालेल्या व्यक्ती....4 हजार 982 
 •  आजअखेर जिल्ह्यात आलेले नागरिक....34 हजार 821 
 •  गुरुवारी दाखल झालेले नागरिक....1 हजार 374 

हे पण वाचा - धारावीतून आलेल्या महिलेसह  वाळव्यातील तरुणाला कोरोना -


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg district awaits 181 reports