Amboli Ghat : आंबोली घाटातून प्रवास करताय? मग, ही बातमी आधी वाचा; मार्गात येतोय अडथळा

आंबोली घाटात (Amboli Ghat) कोसळलेला दरडीचा काही भाग अखेर बाजूला करण्यात आला.
Danoli-Bavalat Road in Amboli Ghat
Danoli-Bavalat Road in Amboli Ghatesakal
Summary

कोसळलेल्या दरडीतील माती व दगड घाटमार्गावर आल्याने रात्रीपासूनच धीम्या गतीने एकेरी वाहतूक सुरू होती.

सावंतवाडी : आंबोली घाटात (Amboli Ghat) कोसळलेला दरडीचा काही भाग अखेर बाजूला करण्यात आला. यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा राबविण्यात आली. पावसामुळे दाणोली-बावळाट मार्गावर (Danoli-Bavalat Road) सोमनाथ मंदिर येथे पाणी आल्याने तो रस्ता दाणोली येथे बंद करण्यात आला.

शुक्रवारी (ता. २१) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली येथील दरडीचा काही भाग, तर अन्य दोन-तीन ठिकाणी दगड व माती रस्त्यावर आली होती. सकाळी बांधकामच्या विभाग कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेली माती दूर करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Danoli-Bavalat Road in Amboli Ghat
Satara Rain : धोका वाढतोय! दरडीच्या छायेतील 489 कुटुंबांचं स्‍थलांतर; 'या' तालुक्‍यांतील गावांचा समावेश

दरड कोसळल्याची माहिती मिळताच तातडीने त्या ठिकाणी दाखल झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेत जेसीबी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र दरडीचा भाग कोसळल्यानंतर त्या ठिकाणी कोणतीही आधुनिक यंत्रणा नसल्याचे निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांच्या मदतीने फावड्याने माती काढण्याचा प्रकार सुरू होता. त्यामुळे याबाबत स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.

तालुक्यात गेले चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे काल रात्री साडेआठच्या सुमारास आंबोली घाटमार्गात दरड कोसळली. ही दरड रस्त्यावरून दूर करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड या कामावर जातीने लक्ष ठेवून आहेत. दुपारी दोनपर्यंत सर्व दगड व माती बाजूला करून नियमित वाहतूक सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Danoli-Bavalat Road in Amboli Ghat
Chiplun Rain : इर्शाळवाडीत दरड कोसळली अन् हादरली कोळकेवाडी; डोंगराला पडल्या भेगा, कुटुंबं संकटात

दरम्यान, कोसळलेल्या दरडीतील माती व दगड घाटमार्गावर आल्याने रात्रीपासूनच धीम्या गतीने एकेरी वाहतूक सुरू होती. त्याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला रात्री दिली होती; मात्र रात्रीचा वेळ व मुसळधार पाऊस यामुळे त्या ठिकाणी काम करणे कठीण झाले होते.

येथील बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता सर्वगोड हे आज सकाळी अकराच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत उपअभियंता वैभव सगळे, शाखा अभियंता विजय चव्हाण व अन्य अधिकारी व कर्मचारीही युद्धपातळीवर ही दरड हटविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.

Danoli-Bavalat Road in Amboli Ghat
पावसाचा जोर वाढला! कर्नाटकच्या आलमट्टीत 44 टीएमसी तर महाराष्ट्राच्या कोयना धरणात किती साठा?

पर्यटकांची रिघ; एकेरी वाहतूक

महिन्याचा चौथा शनिवार असल्याने व सलग दोन दिवस सुटी असल्याने पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात आंबोलीच्या दिशेने येऊ लागले होते; मात्र दरड हटविण्याचे काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुपारी दोनपर्यंत संपूर्ण दरड हटवून रस्ता वाहतुकीस खुला करण्यात येईल, अशी माहिती सर्वगोड यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com