देवरूखमध्ये अडीच कोटी खर्चातून कौशल्य प्रशिक्षण केंद्र 

Skill Training Center At Devrukh Sindhudurg Marathi News
Skill Training Center At Devrukh Sindhudurg Marathi News

साडवली ( रत्नागिरी) - देवरूख शिक्षण मंडळाचे आठल्ये, सप्रे, पित्रे, (स्वायत्त) महाविद्यालय कोकणातील मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्राची उभारणी करणार आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी केंद्र सुरू करणार, अशी घोषणा मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी पत्रकार परिषदेत केली. चार विविध कोर्सेस असलेल्या अडीच कोटीच्या या उपक्रमासाठी कोल्हापूरचे उद्योजक बाळासाहेब जोशी यांनी 1 कोटीची देणगी दिली आहे. कोर्सच्या अभ्यासक्रमाचा आरंभ 26 ऑक्‍टोबरला होणार आहे. 

याबाबत माहिती देताना प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर म्हणाले, युजीसी व एनएसओएफकडून कोकणातील विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान करण्याच्यादृष्टीने एकूण चार व्यावसायिक अभ्यासक्रम मंजूर झालेत. बारावी पास विद्यार्थी यात प्रवेश घेऊ शकतात. उपयोजित रसायनशास्त्र, ग्रामीण संसाधन मॅपिंगसाठी भू माहिती तंत्रज्ञान, शाश्‍वत कृषी, बॅंकिंग आणि वित्त हे चार कोर्स तीन वर्षाचे आहेत. 70 टक्के कौशल्य व 30 टक्के थेअरी असे स्वरूप आहे. या कोर्ससाठी तीस मुलांना प्रवेश मिळणार आहे.

साधारण तीस हजार रुपये फी मर्यादा असेल. या कोर्ससाठी विविध कंपन्यांशी महाविद्यालयाने करार केला असून, नोकरीची संधी लगेच मिळणार आहे. या कोर्सच्या अभ्यासक्रमासाठी व यशस्वीतेसाठी विविध कमिट्या स्थापन केल्या असून, समन्वयक म्हणून प्रा. हेमंत चव्हाण काम पाहत आहेत. सर्व साधनांनी युक्त जी प्लस वन अशी इमारतही होणार आहे. 

कोकणातील हे पहिलेच कौशल्य प्रशिक्षण केंद्र कोकणातील मुलांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करणारे ठरणार आहे. या कोर्सच्या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनास प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पेडणेकर तसेच संजय जगताप, डॉ. नरेश चंद्र व देणगीदार मानद अध्यक्ष बाळासाहेब जोशी उपस्थित राहणार आहेत. इमारतीसाठी दिवाळीत भूमिपूजन समारंभ होणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com