Badlapur : सोनू निगम यांच्या लाईव्ह कॉन्सर्टला बदलापूरकरांची तोबा गर्दी

कपिल पाटील फाऊंडेशन आयोजित अटलसंध्या कार्यक्रमाला हास्यजत्राच्या कलाकारांनी देखील हशा पिकवला
Badlapur
Badlapur esakal

बदलापूर : केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या कपिल पाटील फाऊंडेशन व कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांच्या वतीने, देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली म्हणून आयोजित अटलसंध्या या कार्यक्रमाला जगविख्यात देशाचे पार्श्र्वगायक सोनू निगम यांच्या सुरांनी जादू केली. यावेळी कार्यक्रमाला झालेली गर्दी पाहता ही गर्दी मागील वर्षीच्या गर्दीचा उच्चांक मोडत नवा उच्चांक केला असल्याने, कपिल पाटील यांनी उपस्थित प्रेक्षकांचे यावेळी आभार मानले. यावेळी देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

Badlapur
Career Tips : यशस्वी करिअर घडवण्यासाठी ‘या’ डिजिटल स्किल्सची घ्या मदत

आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमात ५००० प्रेक्षकांची मर्यादा असतानाही, सोनू निगमच्या चाहत्यांनी त्याहून जास्त तोबा गर्दी केली होती. यावेळी सोनू निगम यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट सह, मराठीतील सुप्रसिद्ध शो हास्यजत्रा यातील कलाकारांनी देखील नुसता कल्ला करत एकच हशा पिकवला, तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील सौंदर्यवती स्टार श्रुती मराठे, नेहा पेंडसे, स्मिता गोंदकर, यांनी देखील आपले बहारदार नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध मराठी तारका स्पृहा जोशी हिने केले. यावेळी सोनू निगमच्या आगमनावेळी उपस्थिती प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

तुफान अश्या प्रतिसादात झालेल्या या कार्यक्रमात आयोजक व केंद्रीय मंत्री कपिल पाटील, विधानपरिषद आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर भाजपा गटनेते तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, शहराध्यक्ष शरद तेली, संजय भोईर, रमेश सोळसे भाजपा नेते प्रशांत कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष राम पातकर, माजी नगरसेविका रुचिता घोरपडे, रती पातकर, प्रणिता कुलकर्णी इतर अनेक मान्यवर तथा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी आयोजकांनी प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसाद पाहता पुढील वर्षी या कार्यक्रमाचे याहून मोठ्या स्तरावर आयोजन व नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. (बातमीदार - मोहिनी दशरथ जाधव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com