
ST Bus Accident
esakal
ठळक मुद्दे (Highlights)
एसटी बस-दुचाकीची धडक – चिपळूण तालुक्यातील रिक्टोली येथे एसटी बस आणि दुचाकी यांच्यात अपघात होऊन जयवंत बाबाजी शिंदे (५७) यांचा मृत्यू झाला, तर गणेश शिंदे गंभीर जखमी झाले.
कामावरून परतताना अपघात – दोघेही खडपोली औद्योगिक वसाहतीत सुरक्षारक्षक म्हणून काम करून रात्रपाळीनंतर घरी जात असताना सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
स्थानिकांची मदत व झाडीमुळे धोका – घटनेनंतर गावकऱ्यांनी मदतकार्य केले. परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडझुडपांमुळे दृश्य आडवल्याने अशा अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची स्थानिकांची तक्रार.
Chiplun Accident Case : चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील चिपळूण-तिवरे मार्गावरील रिक्टोली येथील अवघड उतारावरील वळणावर एसटी बस आणि दुचाकीची धडक होऊन तिवरेतील एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी (ता. १) सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. जयवंत बाबाजी शिंदे (वय ५७, रा. तिवरे) असे मृत झालेल्याचे नाव आहे. गणेश पांडुरंग शिंदे गंभीर जखमी झाले आहेत.