
सावंतवाडीत एसटी फेऱ्या रुळावर
सावंतवाडी : संप मिटल्यानंतर तालुक्यात एसटी हळूहळू रुळावर येऊ लागली आहे. आता येथील आगाराकडून सर्व फेऱ्या सुरू केल्या आहेत. या फेऱ्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रतिदिनी सुमारे सात लाख उत्पन्नापर्यंत येथील आगार पोहोचले आहे. सध्या येथील आगारातून लोकलच्या एकूण ५२० फेऱ्या सुरू असल्याची माहिती आगारप्रमुख नरेंद्र बोधे यांनी दिली.
गेली दोन वर्षे एसटी महामंडळ आर्थिक नुकसानीचे झटके सोसतच आहे. कोरोना काळात लॉकडाउनमुळे प्रवाशांअभावी महामंडळाला नुकसानीचे चटके सोसावे लागले. ही परिस्थिती पूर्वपदावर येत असताना महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रमुख मागण्यांसाठी संप पुकारला. यात हळूवार सुरू होत असलेली एसटीसेवा पार कोलमडली. यामुळे एसटीची चाके एकाच ठिकाणी रुतून राहिली. परिणामी महामंडळाचे एकूण उत्पन्न शून्यावर येऊन पोचले होते. यानंतर हा संप थोडा-फार चिघळला. पहिल्या टप्प्यात काही वाहक-चालक हजार झाल्याने काही बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या. यानंतर तब्बल सहा महिन्यांनी संप मिटवल्यानंतर एकूणच एसटी महामंडळाचे सर्व कर्मचारी कामावर हजार झाले. आता एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू झाल्या आहेत. लांब पल्ल्याच्या फेऱ्यांसह लोकल फेऱ्या देखील सुरू केल्या आहेत. याला प्रवाशांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे आगार प्रमुखांनी सांगितले.
लोकलच्या एकूण ५२० फेऱ्या सुरू केल्या आहेत. लोकल व लांब पल्ल्याच्या, असे रोज सात लाखांचे उत्पन्न प्राप्त होत आहे. दोन दिवसांत बेळगाव, रत्नागिरी, कोल्हापूरच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन आहे.
- नरेंद्र बोधे,आगारप्रमुख, सावंतवाडी
लांब पल्ल्याच्या फेऱ्यांच्या वेळा
पुणे शिवशाही ः सकाळी ८.३० सायंकाळी ६.४५, साधी सकाळी ७.१५
रत्नागिरी- सकाळी ७.३०, १०.४५, दुपारी १.०० व २.३०
कोल्हापूर आंबोलीमार्गे तुळजापूर ः सकाळी ९.००
इचलकरंजी ः दुपारी १२.३०, नृसिंहवाडी-दुपारी १.४५
कोल्हापूर ः सकाळी ८.००, १०.३०, दुपारी २.४५
देवरुख ः दुपारी १२.३०
बेळगाव ः सकाळी ८.००, दुपारी १.००, सायंकाळी ६.००
गणपतीपुळे ः सकाळी ८.
सुटीनिमित्त रत्नागिरी-सकाळी ५.३०, बोरिवली-दुपारी ३.००, पुणे १०
व्यावसायिकांना दिलासा
ग्रामीण भागातील लोकांचा एसटीअभावी शहराशी संपर्क तुटल्याने बाजारपेठाही मंदावल्या होत्या. बस स्थानकातील दुकाने, रिक्षाचालक तसेच धंदेही पूर्णतः डबघाईला गेले होते; मात्र आता एसटी सेवा पूर्ववत झाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
Web Title: St Rounds Sawantwadi Daily Income
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..