ऐश्‍वर्या रायचा खून झाला आहे अन्....

 stole a woman's jewelry in chiplun marathi news
stole a woman's jewelry in chiplun marathi news

चिपळूण (रत्नागिरी) - पोलिस असल्याची बतावणी करून एका महिलेचे २ लाख ४० हजार रुपये किमतीचे दागिने पळवल्याची घटना घडली आहे. रत्नप्रभा शंकरराव सुर्वे (वय ७७, रा. काविळतळी) या बुधवारी (ता.२२) सकाळी १०.१५ च्या सुमारास बाजारात जाण्यासाठी निघाल्या होत्या.

असा घातला गंडा

त्या काविळतळी येथील ओल्ड मुंबई आईस्क्रीम दुकानासमोरील भागात आल्या असता, अचानक दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. आम्ही पोलिस आहोत. ऐश्‍वर्या रायचा खून झाला, असून बंदोबस्तासाठी साध्या वेशात आलो आहोत. तुमच्या हातातील पाटल्या व बांगड्या पिशवीत काढून ठेवा, असे सांगितले. त्यांच्या सोन्याच्या पाटल्या व बांगड्या पिशवीत टाकल्याचे भासवून त्या पळवल्याचा प्रकार केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रत्नमाला सुर्वे यांनी चिपळूण पोलिसात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस अधिकारी संदीप पाटील हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com