तौक्‍ते'ची सलामी पावसाने; रत्नागिरीला अतिवृष्टीचाही इशारा

तौक्‍ते'ची सलामी पावसाने; रत्नागिरीला अतिवृष्टीचाही इशारा

रत्नागिरी : अरबी समुद्रात (Arbian sea)निर्माण झालेल्या ‘तौक्‍ते' वादळाची (Tauktae Cyclone)चाहूल शनिवारी लागली. जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली, तर किनारी भागात वारेही वाहत असून, समुद्रही खवळला आहे. हे वादळ कर्नाटकाकडून (Karnataka)येत असून, पहिला फटका समुद्रकिनारी भागातील रत्नागिरी (Ratnagiri)तालुक्‍यातील पावस, पूर्णगड, गावखडी (Paus, Purnagad, Gavkhadi)गावांना बसू शकतो. कारण तालुक्‍यात २०६ गावांपैकी १०४ गावे किनाऱ्यावर आहेत.

Tauktae Cyclone Ratnagiri district update marathi news

वादळाचा प्रभाव रविवारी (ता. १६) सकाळी जिल्ह्यातील किनारी भागांना जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्‍यता आहे. लक्षद्वीप बेटांजवळ शुक्रवारी तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. त्याची तीव्रता वाढून शनिवारी त्याचा तडाखा केरळ किनारपट्टीला बसला. वादळाचा प्रभाव उद्यापर्यंत महाराष्ट्राच्या किनारपट्टीला जाणवणार आहे. शनिवारी त्याचा प्रभाव जाणवू लागला असून, किनारी भागातील वाऱ्याचा वेग वाढलेला आहे. समुद्राच्या लाटा जोरदारपणे ऊसळत आहेत. नागरिकही सतर्क झाले आहेत. हे चक्रीवादळ किनारपट्टीपासून खोल समुद्रात साडेतीनशे किलोमीटर अंतरावरून जाणार आहे.

दरम्यान, आज (ता. १५) रत्नागिरी शहरासह तालुक्‍यातील कुरतडे, तोणदे, पावस, गणपतीपुळे परिसरात वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. तोणदेमध्ये तर अर्धा तास वाऱ्याचे तांडव सुरू होते. कुरतडे येथील भास्कर कुरतडकर यांच्या बागेतील आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी वीजप्रवाह खंडित केला होता. तासाभरानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. चिपळूण शहर परिसरासह गुहागर, राजापूर, लांजा, संगमेश्‍वरमध्ये काही ठिकाणी सायंकाळी मोठ्या सरींसह पाऊस झाला. दापोली तालुक्‍यातील देवके येथील अशोक बैकर आणि अरुण बैकर यांच्या घरावर झाड कोसळून सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्रत्येक गावात पाच मदत पथके

रत्नागिरी तालुक्‍यातील २०६ गावांपैकी १०४ गावे किनाऱ्यावर आहेत. स्थानिक तरुणांच्या सहकार्याने प्रत्येक गावात पाच मदत पथके तयार केली आहेत. रस्ते सफाई, आरोग्य व्यवस्था, लोकांना आवश्‍यक गरजा पुरवणे आणि रेस्क्‍यू पथके सज्ज आहेत. जेसीबी, बुलडोझरसह यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्याचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी सांगितले.

Tauktae Cyclone Ratnagiri district update marathi news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com