गुड न्यूज ; कोकणवासियांना आजपासून मिळणार देव दर्शन 

प्रमोद हर्डीकर
Monday, 8 June 2020

देवरुखची ग्रामदेवता ही ४४ खेड्यांची मालकीण आहे. नवसाला पावणारी देवी अशी भाविकांची श्रध्दा आहे.

साडवली - ऐन शिमगोत्सवात मार्च महिन्यात कोरोनामुळे देवदेवतांची बंद झालेली मंदिरे आजपासून भाविकांसाठी खुली होणार आहेत. कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी देशभरात लाॅकडाउन आहे. कालांतराने देवळात गर्दी होवू नये, यासाठी मंदिरेही लाॅक झाली. यामुळे ऐन शिमगोत्सवात कोकणात घरोघरी येणारी देवीची पालखी आलीच नाही व मंदिरेही बंद झाली.

कोकणच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देवरुखची ग्रामदेवता ही ४४ खेड्यांची मालकीण आहे. नवसाला पावणारी देवी अशी भाविकांची श्रध्दा आहे. परंतु, मंदिरच बंद असल्याने भाविकांनी घरात राहूनच देवीची आराधना केली. आता हे मंदिर नवीन नियमानुसार भाविकांसाठी खुले होणार आहे. 
संपूर्ण महाराष्र्टात प्रसिद्द असणारे व पर्यटक व भाविकांच्या गर्दीने फुलून जाणारे श्री क्षेञ मार्लेश्वर मंदिरही सोमवारपासून भाविकांसाठी खुले होणार आहे. श्री शंकराचाच वार सोमवार आल्याने लाॅकडाउननंतर मार्लेश्वर क्षेत्री भाविकांची पावले वळणार आहेत.

हे पण वाचा - राजन तेली यांनी केली शिवसेनेवर ही टीका

देवस्थान मंडळाने गर्दी टाळण्यासाठी नियम पाळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देण्याचे ठरवले आहे. तीन महिन्यात अशा ठिकाणच्या व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील मंदिरे सोमवारपासून भाविकांसाठीखुली होणार असून शासनाच्या नियमावलींचे पालन करुनच देवस्थान भाविकांसाठी प्रवेश देणार आहेत. भाविकांना मंदिरे खुली झाली याचे समाधान वाटत आहे. मानसिक शांततेसाठी हरीनाम जप व देवदेवतांचे दर्शन मन प्रसन्न करणारे ठरत असते.

हे पण वाचा -  सिंधुदुर्ग : निराधार अनुदान योजनेच्या नव्या समित्यांमध्ये यांचा समावेश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temples in Konkan open for Darshan from today