
"नाणार प्रकल्पाला विरोध कराल तर..."; शिवसेना आमदार राजन साळवींना धमकी
रत्नागिरी : ‘रिफायनरीमे ( nanar refinery)हमारा पैसा लगा हुआ है, अपोज (Protest) मत करना। नहीं तो तुझे और तेरे परिवारको ठोक देंगे।’ अशी धमकी राजापूर विधासनभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी(shivsena mla rajan salavi) यांना फोनवरून देण्यात आली. यामुळे त्यांना व कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. साळवी यानी अज्ञाताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
हेही वाचा: सातारा पालिकेस टाळे ठोकण्याचा शिवसेनेचा इशारा
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, आमदार राजन साळवी सेनेचे आमदार म्हणून २००९ पासून कार्यरत आहेत. नाणार रिफायनरी(nanar rifinery) प्रकल्पाला त्यानी स्थानिक जनतेच्या सोबत राहून विरोध दर्शवला होता. त्यामुळे हा प्रकल्प रद्द झाला. आता पुन्हा समर्थकांनी प्रकल्प होण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. १० जानेवारीला संध्याकाळी साडेसात वाजता ही धमकी देण्यात आली. त्याच दिवशी रात्री ११ वाजून १४ मिनिटांच्या सुमारास परत फोन करून ‘रिफायनरीमे हमारा पैसा लगा हुआ है, अपोज मत करना, नहीं तो तुझे और तेरे परिवारको ठोक कर देंगे।’ अशी धमकी दिली. त्यामुळे आमदार राजन साळवी यांनी १२ जानेवारीला शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली असून अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
हेही वाचा: एकतर्फी बदल अमान्य : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे
‘धमकीच्या चौकशीची मागणी’
आमदार राजन साळवींना (mla rajan salavi)जीवे मारण्याची धमकी आली आहे. राजन साळवी हे कडवे शिवसैनिक (shivsena)आहेत, अशा धमक्यांना ते घाबरत नाहीत. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(home minister dilip walse patil) यांच्याकडे मी करणार आहे,’’ अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत (minister uday samant)यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
Web Title: Threats To Shiv Sena Mla Rajan Salvi Nanar Project Rajapur Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..