

Khed Jagbudi River Drowning three brother death
esakal
Three Brothers Drowned : सुटीसाठी मुंबईहून काकांकडे आलेल्या पाच भावांपैकी तीन सख्ख्या भावांचा जगबुडी नदीत अंघोळीसाठी उतरले असताना बुडून मृत्यू झाला. कांबळे कुटुंबातील नरेश, आकाश आणि कैलास एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही बुडाले. ही सुटी त्यांच्या आयुष्यातली अखेरची सुटी ठरली. मृत्यूचा हा खेळ दोन भाऊ किनाऱ्यावरून हताशपणे पाहात होते.