दापोलीत एकाच घरातील 3 वृद्ध महिलांचा जळून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death by burning
दापोलीत एकाच घरातील 3 वृद्ध महिलांचा जळून मृत्यू

दापोलीत एकाच घरातील 3 वृद्ध महिलांचा जळून मृत्यू

दाभोळ : दापोली तालुक्यातील वणौशी तर्फे नातू गावातील खोतवाडी येथील एकाच घरातील 3 वृद्ध महिलांचा जळून मृत्यू (death by burning) झाल्याची घटना आज समोर आली आहे. या घटनेने अवघा दापोली (Dapoli) तालुका हादरून गेला असून दापोली पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दापोली पालगड मार्गावरील वणौशी तर्फे नातू (Vanoshi Tarfe Natu)या गावांमध्ये खोतवाडी आहे. या खोत वाडी मध्ये सुमारे पस्तीस घरे असली तरी बहुतांशी घरे ही बंद अवस्थेत आहेत येथील बहुतांश ग्रामस्थ हे कामा धंद्या निमित्त मुंबई येथे असतात. या वाडीत केवळ चार ते पाच कुटुंबच वास्तव्याला आहेत.

हेही वाचा: मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

या वाडीतील एका घरामध्ये सत्यवती पाटणे- 75, पार्वती पाटणे - 90 या वृद्ध महिला राहत होत्या तर त्यांच्या समोरच्या घरात त्यांचिच नातेवाईक इंदुबाई पाटणे - 85 या राहायला होत्या सध्या थंडीचे दिवस असल्याने त्या घराची दारं खिडक्या बंद करून राहत असत मात्र दररोज सकाळी त्या उन्हामध्ये बसत असत त्यांच्या घराच्या समोर एक मंदिर आहे. तेथे पूजा करण्याकरिता विनायक पाटणे हे दररोज सकाळी येतात त्यांना आज सकाळी या महिला बाहेर उन्हामध्ये शेकण्यासाठी बसलेल्या दिसल्या नाहीत शिवाय त्यांना मंदिराची किल्ली देखील हवी होती म्हणून ते किल्ली मागण्यांकरिता या महिलांच्या घरामध्ये गेले मात्र घरातून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही मग त्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा लोटून पाहिला असता तो त्यांना उघडा असलेला आढळून आला तो लोटून ते घरात गेले असता त्याना त्या वृद्ध महिला जळलेल्या तसेच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी ही बाब ग्रामस्थांना सांगितली , ग्रामस्थांनी येऊन खातरजमा केली असता घरामध्ये तीन खोल्यांमध्ये तीन महिला मृतावस्थेत आढळून आल्याचे त्यांना दिसून आले त्यांनी ही घटना तत्काळ त्यांचे मुंबईतील नातेवाईक यांना कळवली हे नातेवाईक मुंबई येथून गावी येण्यास निघाले आहेत, दापोली पोलीस ठाण्यात 3 वाजेपर्यंत या घटनेची माहिती नव्हती, त्यानंतर घटनास्थळी गेलेल्या पत्रकारांनी पोलिसांना घटना काळविल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे कर्मचार्यांसह घटनास्थळी रवाना झाले आहेत.

हेही वाचा: चोरांचा मटणावर डल्ला, मतदारांनी अंड्यांवर भागवली भूक

या महिला ज्या घरांमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या त्या घराचा पुढील दरवाजा बंद होता व मागील दरवाजा उघडा होता त्यातील सत्यवती पाटणे या पडवीमध्ये चुलीच्या जवळ मृतावस्थेत जळलेल्या अवस्थेत आढळून आल्या त्यांचे डोके फुटून त्यातून बरेच रक्त देखील वाहून गेल्याचे दिसून येत होते, पार्वती पाटणे या अनेक वर्षे अंथरुणाला खिळून होत्या, त्या दुसऱ्या खोलीमध्ये जळलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्या. इंदुबाई पाटणे या त्यांच्या समोरच्या घरात राहणाऱ्या त्यांच्या दुसऱ्या नातेवाईक होत्या त्या या दोन महिलांच्या घरातील हॉलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या शिवाय या घराचा दरवाजा आतल्या बाजूने बंद होता, या सर्व प्रकारामुळे हा घातपात असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, दापोली पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले असून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देणार असून तपासकामी मार्गदर्शन करणार आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top