Three women quarantine in Mandangad
Three women quarantine in Mandangad

त्या तिघी ‘औषधं‘ म्हणून आल्या अन् क्वारंटाईन झाल्या ; फार्मा स्टीकर खोटचं....

मंडणगड  (रत्नागिरी) : फॉर्मा केमिकलचा मोठा स्टीकर गाडीवर लावून गाडीतून प्रवासी वाहतूक करणार्‍यास मंडणगड पोलिसांनी 24 एप्रिलला म्हाप्रळ चेक पोस्ट येथे पोलिस तपासणी नाक्यात ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवाशांची वाहूतक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन पोलिसांनी जप्त केले. सुबोध मोहन घोष (वय 35, रा. घोडबंदर रोड, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. 

फार्मा स्टीकर लावून वाहतूक
अत्यावश्यक सेवेत समावेश असल्याचा गैरफायदा घेऊन काहीजण मुंबईतून तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याची खबर पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांना मिळाली होती. 24 एप्रिलला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास म्हाप्रळ पोलिस चेक पोस्टवर (एमएच-04-जेयु-2116) आली. गाडीवर फॉर्मा केमिकल स्टीकर व गुजराती भाषेतील मजकूर असलेला परवाना लावण्यात आला होता. गाडीची पोलिसांनी तपासणी केली असता गाडीत तीन महिला आढळून आल्या.

मंडणगड पोलिसांची कारवाई

अधिक चौकशी केली असता त्या वाशी ते दापोली असा प्रवास करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी विद्या विजय खोपरे (वय 45, रा. बोरीवली), शेवंती सखाराम रटाटे (65), शुभांगी शिवराम बंगाल (दोघेही रा. बोरखत, मंडणगड) यांना मंडणगड शहरातील विलगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले. गाडीचा चालक सुबोध घोष यावर भादवि कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 (ब) मोटार वाहन कायदा कलम 66(1) 192 (अ) (1) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार पवार करीत आहेत.

मंडणगड पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे विनापरवाना अवैध वाहतूक करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. तसेच विनाकारण लॉकडाऊनचे नियम मोडणार्‍या तालुक्यातील 240 वाहनधारकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत सुमारे 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com