ZP Transfers
ZP Transfersesakal

ZP Transfers : जिल्हा परिषदेत कालावधी पूर्ण झालेल्या 86 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

समुपदेशनात प्रक्रियाः १९ प्रशासकीय, ६२ विनंतीसह ५ आपसी बदल्यांचा समावेश

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती आणि आपसी बदल्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी मान्यता दिली आहे. जिल्हा परिषद येथे झालेल्या समुपदेशनात ८६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात १९ प्रशासकीय, ६२ विनंती आणि ५ आपसी बदल्या झाल्या आहेत.

एक टेबल तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेले आणि एका विभागात ५ वर्षाचा कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासनाने प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. काही कारणास्तव विनंती बदलींसाठी कर्मचाऱ्यांनी विनंती अर्ज प्रशासनाकडे केले होते.

यावर नुकतीच येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांच्या अध्यक्षतेखाली समुपदेशन प्रक्रिया पार पडली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी राजेंद्र पराडकर आणि विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या समुपदेशन प्रक्रियेत तब्बल ८६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.


सामान्य प्रशासन विभाग
वरिष्ठ सहाय्यक-१ (प्रशासकीय)
कनिष्ठ सहायक-६ (प्रशासकीय)
विनंती-१८
परिचर-५ (विनंती)

ZP Transfers
ZP Employees Transfer: जि.प. कर्मचाऱ्यांच्या आजपासून बदली प्रक्रीया

वित्त विभाग
सहाय्यक लेखाधिकारी १ (प्रशासकीय)
कनिष्ठ सहाय्यक (ले.) १ (प्रशासकीय)

बांधकाम विभाग
कनिष्ठ अभियंता १ (प्रशासकीय)

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
कनिष्ठ अभियंता १ (प्रशासकीय).

महिला बालकल्याण विभाग
पर्यवेक्षिका-२ (प्रशासकीय)
विनंती-२

ZP Transfers
Police Transfer : राज्यातील 20 पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या

शिक्षण विभाग
विस्तार अधिकारी-२ (प्रशाकीय)
केंद्रप्रमुख-१ (विनंती)

पशुसंवर्धन विभाग
पशुधन पर्यवेक्षक-४ (प्रशासकीय)
विनंती-२

कृषी विभाग
कृषी विस्तार अधिकारी-१ (प्रशासकीय)
आपसी-२

ग्रामपंचायत विभाग
ग्रामविकास अधिकारी-३ (विनंती)
ग्रामसेवक-१३ (विनंती)

ZP Transfers
ZP Employee Transfers : पहिल्या दिवशी जि. प. कर्मचारी बदल्यांची सेन्चुरी!

आरोग्य विभाग
औषध निर्माण अधिकारी-१ (विनंती)
आरोग्य सहाय्यक-२ (आपसी)
आरोग्य सहाय्यक महिला-१ (विनंती)
आरोग्य सेवक-६ (विनंती)
आपसी-१
आरोग्य सेवक महिला-९ (विनंती)

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये बदल्यांबरोबरच पदोन्नती काही कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत विविध कार्यालये आस्थापना येथे परिचर पदावर कार्यरत असलेल्या ३० कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) या पदावर काही अटी, शर्थी ठेऊन पदोन्नती देण्यात आली आहे. या प्रस्तावाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे.
- सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com