शास्त्री खाडीलगतच्या भागात दोन दिवस पूरसदृश स्थिती

शास्त्री खाडीलगतच्या भागात दोन दिवस पूरसदृश स्थिती

Published on

३३ (पान ५ साठी)

rat२६p६२.jpg ः
२३M१९१२२
संगमेश्वर ः शास्त्री खाडीजवळील भागात पूर.

शास्त्री खाडीकिनारी पूरसदृश स्थिती

भातशेती पाण्याखाली ; नुकसानची भीती

संगमेश्वर, ता. २६ ः पावसाचा जोर, खाडीभागातील पुराचे पाणी येथील शेतकऱ्यांची पाठ काही सोडत नाही. मागील पंधरवड्यात सुमारे सहावेळा येथील शास्त्री खाडी दुथडी भरून वाहत आहे. पावसाचा जोर वाढत असून येथील शास्त्री खाडीला पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने उसंत घेतल्यावर पुराचे पाणी भरत आहे. गेल्या १५ दिवसात किमान सहावेळा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज पावसाचा जोर वाढल्याने मंगळवारी (ता. २५) खाडीतील नेहमीचे पाणी वाढलेले असताना पुन्हा आज सकाळपासून पाण्यात वाढ होऊन येथील खाडी दुथडी भरून बाजारपेठसह खाडी किनाऱ्यालगत असलेल्या परचुरी, फुणगूस, कोंडये, दावखोल, मांजरे, मेढे तसेच खाडी पलीकडील डिंगणी, पिरंदवणे, करजुवे या गावातील भातशेतीमध्ये पाणी घुसल्याने सतत पंधरा दिवस लावणीची कामे खोळंबली आहेत. तर काहींची लावणी पूर्ण झाली आहे. पुराचे पाणी शिरल्यामुळे भातशेतीचे नुकसान होण्याची भीती आहे. आज सकाळपासून संततधारा सुरू आहे. पाणी पातळीतही तेवढ्याच वेगाने वाढ होत असून, पावसाचा जोर कमी झाला नाही. दोन वर्षापूर्वीच्या अतिवृष्टीची सीमा पार करेल की काय? अशा भीतीने नागरिकांमध्ये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.