Ratnagiri News : रंगकाम ठेकेदाराची मुलगी झाली एमबीबीएस
संगमेश्वर - संगमेश्वर तालुक्यातील कानरकोंड येथील रंगकाम ठेकेदाराची मुलगी एमबीबीएस झाली असून, तिने आपले शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केल्यानंतर ती पुढील शिक्षण मुंबईला जाऊन पूर्ण केले.
अस्मिता आत्माराम कानर हिचे लहानपणापासून डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा आंबेडबुद्रुक कानरकोंड या ठिकाणी घेतल्यानंतर वडील मुंबईला असल्याने तिने पुढील शिक्षणासाठी मुंबई गाठली. मुंबई येथे बारावी सायन्स केल्यानंतर नीट परीक्षा दिली; परंतु भारतामध्ये एमबीबीएससाठी प्रवेश मिळाला नाही.
अस्मिताने या ठिकाणी न खचता एमबीबीएस शिक्षण घेण्यासाठी रशियात जाण्याचा निर्णय घेतला. तिने एमबीबीएस या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. कानरकोंड गावातील तसेच पंचक्रोशीतील दुर्गम गावातील ही पहिलीच विद्यार्थिनी आहे. तिचे वडील हे सर्वसामान्य घरातील असून, ते रंगकाम ठेकेदार आहेत.
कठीण परिस्थितीमध्ये तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तिच्या यशाबद्दल अस्मिता म्हणाली, मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कठीण परिस्थितीमध्ये न खचता परिपूर्ण अभ्यास आणि चिकाटीने आपले यश संपादन करता येते. यापुढेही आपण शिक्षण चालू ठेवणार असल्याचे तिने सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.