Parashuram Ghat
Parashuram Ghatesakal

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास होणार सुसाट; परशुराम घाटातील 'हा' कठीण कातळ फोडण्यात यश

मुंबई-गोवा महामार्गावरील एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.
Summary

परशुराम घाट ते आरवलीदरम्यान ३६ किमी अंतरात केवळ सव्वाकिमीचे काँक्रिटीकरण शिल्लक आहे.

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) बहुचर्चित परशुराम घाटातील (Parashuram Ghat) अतिशय कठीण कातळ फोडण्यासाठी नऊ महिने लागले. आता तो कातळ पूर्णपणे फोडण्यात यश आल्यानंतर तेथील रखडलेल्या दुसऱ्या लेनच्या काँक्रिटीकरणाचे काम तातडीने सुरू झाले आहे.

परशुराम घाट ते आरवलीदरम्यान ३६ किमी अंतरात केवळ सव्वाकिमीचे काँक्रिटीकरण शिल्लक आहे. गणेशोत्सवापूर्वी उर्वरित काम मार्गी लागल्यास चिपळूण हद्दीत महामार्गावरील प्रवास वेगाने होणार आहे. घाटातील चिपळूण हद्दीतील इगल इन्फ्रा कंपनीने या आधीच काम पूर्ण केले; परंतु खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीमार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन अनेक दिवस थांबले होते.

Parashuram Ghat
Kolhapur : अनैतिक संबंधातून वन विभाग सर्व्हेअरचा डोक्यात दगड घालून खून; रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात पडला भास्करचा मृतदेह

या ठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला होता. आता कातळ फोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या दुसऱ्या लेनचे काम वेगाने सुरू आहे. काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने त्या आधी घाटात चौपदरीकरणातील दुसराही मार्ग सुरू करण्यावर भर दिला जात आहे.

पावसाळ्यात महामार्गावर आलेली माती हटवण्यात येत आहे. त्यानंतर काँक्रिटीकरणाचे कामही तातडीने हाती घेतले जाईल. त्यासाठी गेले तीन दिवस सपाटीकरणाचे काम सुरू आहे. काँक्रिटीकरण पूर्ण करून घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीस खुले केले जातील.

Parashuram Ghat
Bus Accident : चंदगड-गडहिंग्लज मार्गावर विचित्र अपघात; एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, चार दहावीचे विद्यार्थी जखमी

दुसऱ्या लेनसाठी डिसेंबरची डेडलाईन

सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असल्याचे सांगितले आहे. दुसऱ्या लेनचेही काम डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे महामार्गावरील प्रवास वेगाने होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com