Bus Accident : चंदगड-गडहिंग्लज मार्गावर विचित्र अपघात; एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, चार दहावीचे विद्यार्थी जखमी

जखमी विद्यार्थी नागनवाडी येथील धनंजय विद्यालयाचे आहेत.
Bus Accident Chandgad-Gadhinglaj Road
Bus Accident Chandgad-Gadhinglaj Roadesakal
Summary

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाचा ताबा सुटून विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या चार विद्यार्थ्यांना धडक बसली.

चंदगड : चंदगड- गडहिंग्लज मार्गावर (Chandgad-Gadhinglaj Route) सातवणे (ता. चंदगड) गावच्या हद्दीत चाळोबा देवालयानजीक एसटी बस व दुचाकीस्वार यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. बाळू तुकाराम साबळे (वय ५२, रा. सत्तेवाडी, ता. चंदगड) असे त्याचे नाव आहे.

Bus Accident Chandgad-Gadhinglaj Road
अजस्र लाटांचा तडाखा! मासेमारी करणाऱ्या नौकेला जयगड समुद्रात जलसमाधी; मच्छीमारांनी वाचविले 10 खलाशांचे प्राण

तर, दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाचा ताबा सुटून विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या चार विद्यार्थ्यांना धडक बसली. त्यात ते गंभीर जखमी झाले. शुभम संजय गावडे, सिद्धेश मारुती ढोकरे (दोघेही रा. सावर्डे), कुणाल कृष्णा कांबळे (कानडी), वैभव भरत कोंडुसकर (पोवाचीवाडी) हे दहावीचे विद्यार्थी गंभीर जखमी झाले.

Bus Accident Chandgad-Gadhinglaj Road
Raju Shetti : 'शरद पवारांच्या पाठीत खंजिर खुपसला, तसंच धनंजय मुंडे एक दिवस अजितदादांच्या पाठीत खंजिर खुपसतील'

ते नागनवाडी येथील धनंजय विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर बेळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल सकाळी सव्वाआठच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत अधिक माहिती अशी, दोडामार्गहून चंदगडमार्गे कोल्हापूरला जाणारी बस (एमएच १४ बीटी ४२३१) चाळोबा देवालयानजीक आली असता दुचाकीस्वार साबळे अचानक समोरच्या जोड रस्त्यावरून थेट मुख्य रस्त्यावर आले. भरधाव एसटीचालकाचा अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे ताबा सुटला.

Bus Accident Chandgad-Gadhinglaj Road
Kolhapur : अनैतिक संबंधातून वन विभाग सर्व्हेअरचा डोक्यात दगड घालून खून; रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात पडला भास्करचा मृतदेह

दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी त्याने एसटी विरुद्ध दिशेला घेतली. मात्र वेगावर नियंत्रण ठेवता न आल्याने दुचाकीस्वाराला फरपटतच एसटी विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना जाऊन धडकली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यांना बेळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मृत साबळे हे दौलत कारखान्यात नोकरीला होते. धडकेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com