Rajapur Municipality
Rajapur Municipalityesakal

राजापूरवासीयांना आता घरबसल्या भरता येणार कर; नगरपालिकेची सुविधा, नागरी सेवा पोर्टल विकसित

नागरी सेवा पोर्टलअंतर्गत शासनातर्फे तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन करप्रणालीची राजापूर नगरपालिकेने अंमलबजावणी सुरू केली आहे.
Summary

राजापूरकरांना ऑनलाईन (Online) वा डिजिटल पद्धतीने कुठेही बसून घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ताकरांसह अन्य करांच्या रकमेची भरणा करणे शक्य झाले आहे.

राजापूर : स्थानिक स्वराज्य संस्था वा नगरपालिकांच्या (Rajapur Municipality) माध्यमातून नागरिकांना सुलभ पद्धतीने सोयी-सुविधा देता याव्यात वा विविध मालमत्ताकरांची वसुली करणे अधिक सोयीचे व्हावे, यादृष्टीने नागरी सेवा पोर्टल (mahaulb.in/MahaULB/index)अंतर्गत शासनातर्फे ऑनलाईन करप्रणाली विकसित करण्यात आली आहे. या करप्रणालीची राजापूर पालिकेने अंमलबजावणी सुरू केली आहे.

Rajapur Municipality
कर्नाटकातील स्वस्त डिझेलची महाराष्ट्रात विक्री; दररोज 30 हजार लिटरचा पुरवठा, सीमाभागातील अनेक पंपांना फटका

त्यामुळे राजापूरकरांना ऑनलाईन (Online) वा डिजिटल पद्धतीने कुठेही बसून घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ताकरांसह अन्य करांच्या रकमेची भरणा करणे शक्य झाले आहे. नगरपालिकेकडून नागरिकांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्या बदल्यात पालिकेकडून विविध स्वरूपाची कर आकारणी केली जाते. विविध स्वरूपाची दरवर्षी केली जात असलेली ही करआकारणी आणि त्याद्वारे संकलित होणारा महसूल पालिकेच्या उत्पन्नाचा हक्काचा स्त्रोत असतो.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ वा त्यातून विकासकामांसाठी निधी मिळविण्यासाठी शासनाकडे जमा करावी लागणारी लोकवर्गणीची उभारणीही या महसुलाच्या माध्यमातून करणे शक्य होते. त्यामुळे वर्षभरामध्ये शंभर टक्के करवसुली करण्यावर पालिका प्रशासनाकडून भर दिला जातो. कर मागणीपत्र देणे, करांची वसुली करणे, थकबाकीपोटी मिळकती जप्त करणे, नळजोडण्या तोडणे आदी कारवाया पालिका करत वसुली विभाग करांचा भरणा करून पालिकेची हक्काची तिजोरी अधिक सक्षम करतो.

Rajapur Municipality
सरकारचा विरोध असतानाही सीमाभागातील 865 गावांना मिळणार महाराष्ट्राच्या 'या' योजनेचा लाभ; कसं ते जाणून घ्या..

या प्रक्रियेमध्ये अधिक गतिमानता येण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेताना शासनाच्या नगर विकास निभागातर्फे नागरी सेवा पोर्टलवर तयार करण्यात आले आहे. त्याअंतर्गंत शासनातर्फे तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन करप्रणालीची राजापूर पालिकेतर्फे अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांना आता प्रत्यक्ष पालिकेमध्ये न येता घरपट्टी, पाणीपट्टीसह अन्य विविध स्वरूपाच्या करांची भरणा ऑनलाईन पद्धतीने सहज करता येणार आहे.

नागरी सेवा पोर्टलअंतर्गत शासनातर्फे तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन करप्रणालीची राजापूर नगरपालिकेने अंमलबजावणी सुरू केली आहे. यावर्षीपासून थकीत मालमत्ता करावर दंड आकारणीही करण्यात येणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी वेळेमध्ये करभरणा करावी.

-प्रशांत भोसले, मुख्याधिकारी

Rajapur Municipality
'होम स्टे'मुळं पर्यटन व्यवसायाला आर्थिक बळ; दाजीपूर अभयारण्य परिसरात पाच वर्षांत होणार 'इतक्या' घरांची उभारणी

क्युआरकोड विकसित

ऑनलाईन करप्रणालीसोबत क्युआरकोडही विकसित करण्यात आला आहे. मालमत्ताधारकाला पालिकेकडून देण्यात येणाऱ्‍या विविध प्रकारच्या करभरणा नोटिसीवर क्युआर कोडही देण्यात आलेला आहे. अनेकांच्या मालमत्ता शहरामध्ये असल्या तरी हे मालमत्ताधारक नोकरी वा अन्य कामानिमित्ताने शहराबाहेर वास्तव्याला असतात. त्यावेळी करवसुली करणे अडचणीचे ठरते. त्यामुले थकबाकी वाढते. क्युआर कोड वा डिजिटल करप्रणालीमुळे करभरणा करणे वा करवसुलीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com