Water Shortage in Ratnagiri
Water Shortage in Ratnagiriesakal

Water Crisis : रत्नागिरीत 'इतके' दिवस पाणी कपात; शिल्लक साठा पुरवण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय

शिळ धरणात गेल्या आठवड्यात १.९१७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.
Published on
Summary

शिळ धरणातील शिल्लक पाणीसाठा पावसापर्यंत शहरवासीयांना पुरविण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे.

रत्नागिरी : येथील पालिकेने (Ratnagiri Municipality) पाणी टंचाईवर (Water shortage) मात करण्यासाठी पाणी कपातीचा मोठा निर्णय घेतला आहे. १ मार्च २०२४ पासून शहरात आठवड्यातून सोमवार आणि गुरुवार असे २ दिवस पाणी कपात करण्यात येणार आहे. शिल्लक साठा पुरवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

‘एल-निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेचा मॉन्सूनवर (Monsoon) मोठा परिणाम झाल्याने सरासरी पर्जन्यमानापेक्षा यावर्षी कमी पर्जन्यमान झाले. परिणामी शिळ धरणात (Shil Dam) कमी पाणीसाठा झाला असून उष्ण तापमानामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाणीपातळी घटत आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मॉन्सूनच्या आगमनापर्यंत धरणातील शिल्लक पाणीसाठा पुरविण्यासाठी पाणी कपात अनिवार्य आहे.

Water Shortage in Ratnagiri
कधीकाळी चक्क 'या' अभिनेत्यानं देवालाही घातलेल्या शिव्या, माझ्याच वाट्याला का हे दुःख म्हणून झालेला उद्विग्न!

मॉन्सूनच्या आगमनापर्यंत शहरातील नागरिकांस पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी १ मार्च २०१४ पासून प्रत्येक आठवड्याच्या सोमवार आणि गुरुवार या २ वारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Water Shortage in Ratnagiri
Sahyadri Forest Journey : 'शरीर आणि मन हलकं करणारा रानगंध'

गतवर्षीच्या तुलनेत घट

शिळ धरणात गेल्या आठवड्यात १.९१७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन झाले नाही, तर पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाणी पुरणे अशक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर फारच जपून करण्याची वेळ आली आहे. शिळ धरणाची साठवण क्षमता ४.३७१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात २.०८२ दशलक्ष घनमीटर साठा होता. हाच साठा आता १.९१७ दशलक्ष घनमीटरपर्यंत घसरला आहे.

Water Shortage in Ratnagiri
विषयचं हार्ड! 'त्या' काळात कोल्हापुरात व्हायच्या उंटांच्याही झुंजी, संशोधनातून माहिती समोर; कबुतरांसह बैल, म्हशींचा नाद मात्र कायम

शिळ धरणातील शिल्लक पाणीसाठा पावसापर्यंत शहरवासीयांना पुरविण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे. म्हणून आम्ही या महिन्यापासून सोमवार आणि गुरुवार असा दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवणार आहे.

-तुषार बाबर, मुख्याधिकारी, रत्नागिरी पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com