Narendra Modi Gram Panchayat
Narendra Modi Gram Panchayatesakal

Nitesh Rane : देशात प्रभावी योजना पंतप्रधान मोदींनी आखल्या; काय म्हणाले आमदार नीतेश राणे?

मोदींच्या योजनांमुळे ग्रामपंचायतींना आर्थिक बळकटी मिळून त्‍या सक्षम होत आहेत.
Summary

सर्व प्रकारची कार्यालये एकाच ठिकाणी येतील अशी ग्रामपंचायतीची भव्य इमारत उभी राहावी, अशा प्रकारची प्रभावी योजना पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) आखली.

कणकवली : देशातील सर्व ग्रामपंचायतींना (Gram Panchayat) आर्थिक निधी मिळावा. सर्व प्रकारची कार्यालये एकाच ठिकाणी येतील अशी ग्रामपंचायतीची भव्य इमारत उभी राहावी, अशा प्रकारची प्रभावी योजना पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) आखली. या योजनेतील पहिले ग्रामसचिवालय वागदे येथे उभे राहत आहे. मोदींच्या अशा योजनांमुळे ग्रामपंचायतींना आर्थिक बळकटी मिळून त्‍या सक्षम होत आहेत, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले.

केंद्र सरकारच्या (Central Government) नमो - ११ अभियान अंतर्गत कणकवली तालुक्यातील वागदे ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, महेश गुरव, संदीप मेस्त्री, समीर सावंत, सायली सावंत, वागदे सरपंच संदीप सावंत, अरुण चव्हाण, सूर्यकांत वारंग, शामल गावडे, मंगेश जाधव, मनीषा बोडके, सुनील कदम, बबली राणे, गंगाधर पाटील उपस्थित होते.

Narendra Modi Gram Panchayat
आता कैद्यांना मिळणार आयुष्मान भारत, ई-श्रम कार्ड; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात देशातला पहिलाच उपक्रम

श्री. राणे म्‍हणाले, वागदे येथील उभ्या राहत असलेल्‍या ग्रामसचिवालयाच्या माध्यमातून लोकांना एकाच छताखाली विविध कार्यालयांचा उपभोग घेता येणार आहे. त्यामुळे लोकांची होणारी धावपळ व ताण कमी होणार आहे. त्यांचा घर ते सचिवालय दरम्यानचा खर्च देखील वाचेल आणि त्यांचे काम देखील प्रभावी होईल. म्हणून या सगळ्यांच्या प्रयत्नाने गावाचा विकास करणे हे त्या सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना अजून सोयीस्कर होईल. त्या दृष्टीने ही योजना केंद्र सरकारची प्रभावी योजना असून सर्वांगीण विकास करणारी आहे. यावेळी संतोष कानडे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच संदीप सावंत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नीलेश पवार यांनी केले.

Narendra Modi Gram Panchayat
मोदींच्या 'त्या' गॅरंटीमुळे महायुतीचा उमेदवार अडीच लाख मतांनी पराभूत होईल; खासदार राऊतांना विश्वास

नवीन ग्रामसचिवालयात सर्व कार्यालये

वागदे येथे नव्याने होणाऱ्या ग्रामसचिवालयात तलाठी, मंडल कार्यालय, ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, ग्रामसंघ कार्यालय, महावितरण, एटीएम केंद्र, अशी सर्व कार्यालये असणार आहेत, अशी माहिती सरपंच संदीप सावंत यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com