Vinayak Raut Ratnagiri-Sindhudurg Constituency
Vinayak Raut Ratnagiri-Sindhudurg Constituencyesakal

मोदींच्या 'त्या' गॅरंटीमुळे महायुतीचा उमेदवार अडीच लाख मतांनी पराभूत होईल; खासदार राऊतांना विश्वास

लोकसभा मतदार संघात चार मंत्री असताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना इथे आणावे लागते, हे दुर्दैव आहे.
Summary

'रिफायनरी प्रकल्पाच्या नावाखाली सामान्य जनतेला देशोधडीला लावून भू-माफियांना साथ देणाऱ्यांना मी विरोध केला. त्यामुळे मी खलनायक आहे.'

कणकवली : सध्या मोदी गॅरंटीची (Modi Guarantee) जाहिरातबाजी केली जात आहे. मात्र मोदींच्या याच गॅरंटीमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील (Ratnagiri-Sindhudurg Constituency) महायुतीचा उमेदवार (Mahayuti Candidate) अडीच लाख मतांनी पराभूत होईल. आमची महाविकास आघाडी लोकसभा ते ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत ती कायम राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने काम करूया. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही मी कार्यरत राहीन, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.

कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात महाविकास आघाडीचा मेळावा झाला. यात खासदार राऊत (Vinayak Raut) बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर, संदेश पारकर, संजय पडते, बाळा गावडे, सतीश सावंत, सुशांत नाईक, जान्हवी सावंत, नीलम सावंत, अतुल रावराणे, संग्राम प्रभुगावकर, भाई गोवेकर, अमित सामंत, रेवती राणे, अर्चना घारे, ईर्शाद शेख, विकास सावंत, साक्षी वंजारे, नागेश मोरये, सायली पाटकर, नितिषा नाईक, विवेक ताम्हणकर उपस्थित होते.

Vinayak Raut Ratnagiri-Sindhudurg Constituency
उद्धव ठाकरेंनी पदाचा राजीनामा देऊन वर्षा बंगला सोडला, तेव्हा मद्यपान करून गद्दारांची औलाद..; काय म्हणाले राऊत?

राऊत म्‍हणाले, भाजपचे प्रमोद जठार माझ्यावर विकासातील खलनायक असल्‍याची टीका करत आहेत. मात्र रिफायनरी प्रकल्पाच्या नावाखाली सामान्य जनतेला देशोधडीला लावून भू-माफियांना साथ देणाऱ्यांना मी विरोध केला. त्यामुळे मी खलनायक आहे, असे त्‍यांना वाटते. पण, जनतेच्या हितासाठी मी लढत राहीन, मग मला कितीहीवेळा खलनायक म्हटले तरी चालेल.

Vinayak Raut
Vinayak Raut

राऊत म्‍हणाले, लोकसभा मतदार संघात चार मंत्री असताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना इथे आणावे लागते, हे दुर्दैव आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बेसावध आणि बेफिकीर राहू नये, प्रत्येक घराघरांत जाऊन विचार पोहचवावा. राऊत म्‍हणाले, दिल्लीत माझा बंगला नाही, पण तुम्‍हा सर्वांचे घर आहे. या विनायक राऊत यांची गेल्या १० वर्षांत वडिलोपर्जित जमिनीपेक्षा किती जमीन वाढली आहे. ते मला दाखवावे. तसेच वाढलेली जमीन राणे कुटुंबीयांनी घ्यावी. तर प्रमोद जठार यांनी माझा लेखाजोखा चष्मा लावून वाचावा. त्यामुळे मी काय केले ते त्यांना समजेल.

Vinayak Raut Ratnagiri-Sindhudurg Constituency
'सर्वोच्च' निकाल लागेपर्यंत कर्नाटक-महाराष्ट्राचा बेळगाव सीमाभागावर दावा नको; 'माहिती हक्क'मधून माहिती उघड

विकास सावंत म्हणाले, राऊत केव्हाही शिवराळ भाषा वापरत नाहीत. संस्कृती आणि संस्कार त्यांच्यामध्ये आहेत. विरोधकांनी टोकाची टीका केल्यानंतर पण ते त्यांच्याशी चांगलेच वागत आहेत. मोदींना सकाळी उठल्यावर प्रथम काँगेसच दिसत आहे. अबकी बार ४०० पार ही भाजपची घोषणा अत्यंत घातक आहे. भाजप मधील ७७ खासदार हे मूळ काँगेसचे आहेत.

Vinayak Raut Ratnagiri-Sindhudurg Constituency
कात्रेश्वराच्या पुनर्निर्माणामुळे तब्बल 900 वर्षे जुना इतिहास उजेडात; चालुक्य-यादव काळातील सापडली मातीची भांडी

अरुण दुधवडकर म्हणाले, सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही आणि जुलूमशाही चालली आहे. त्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी आपण जनतेसमोर गेलो पाहिजे. जान्हवी सावंत, सुशांत नाईक, विवेक ताम्हणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. भालचंद्र दळवी यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com