Sambar
Sambaresakal

Konkan News : 'सांबराची किंकाळी ऐकू आली अन् आमची हालचाल कमी झाली'

रानकुत्र्याविषयी आतापर्यंत ऐकलेल्या वाचलेल्या सर्व कथा, गोष्टी क्षणार्धात डोळ्यासमोरून तळरून गेल्या.
Summary

गेली दोन वर्षे अनेक गावात आम्ही लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये या प्राण्यांच्या कळपाने वेळोवेळी दर्शन दिले होते.

Konkan News : सांबरची मादी एव्हाना झुडुपात शिरली. तिचे पिल्लू मात्र तेवढे सुदैवी ठरले नाही. उडी मारण्याच्या प्रयत्नात ते झुडपाच्या ओपनिंगच्या आधीच कोसळले. त्याच्या नाकातोंडातून रक्त येत होते. आम्हाला असे अचानक मध्ये बघून रानकुत्र्याने अचानक माघार घेतली आणि आमच्या सुदैवाने तो मागच्या वाटेने समोरच्या झाडीत गायब झाला. आता आमचा श्वास परत चालू झाला असावा. कारण काय घडतंय आणि काय घडलेय, याची आता कल्पना येऊन आमचे पाय समोरच्या देवळाच्या आवारात नकळत वळले होते.

Sambar
जंगल भटकंतीचा आनंद अन् थरारही..; भेकराचं भुंकणं, बिबट्याची साद, वानरांचं खेकसणं आणि बरंच काही..

देवळाचे बांधकाम चालू असल्यामुळे सर्वत्र चिरे, वाळू, खडी आणि इतर सामान पडलेलं होतं. मंदिरसुद्धा (Temple) बांधकाम चालू असल्यामुळे पाडलेलं. त्यामुळे तशी लपण्याची जागा म्हणजे काय तो शेजारच्या इमारतीत असलेला आडोसा. जेमतेम दोन फूट उंचीचे बांध बाकी सगळं उघड असणारी ही इमारत. त्यामुळे मनात धाकधूक घेऊन आम्ही तिथे वाकून बसलो. सांबरचं पिल्लू उठण्याचा प्रयत्न करत होतं; पण थकल्यामुळे त्याच्या शरीराने केव्हाच साथ सोडली असावी.

“वाट संपून देवळाकडे पोचता पोचता सांबराच्या इशारावजा आवाजाने अचानक आमचं लक्ष वेधून घेतलं. शांत गंभीर दुपारी आजूबाजूला कोणतेच आवाज नसताना हा आवाज नदीच्या दरीत खोलवर घुमला. आता समोर सांबर मिळू शकतं, या आशेने मन प्रफुल्लित झालं आणि पाठोपाठ कुई अशा आवाजाने लक्ष वेधलं. पाठोपाठ पळताना पावलांचे सुक्या पानात येणारे आवाज, झुडपांची हालचाल असे अनेक आवाज अगदी समोरून यायला लागले. आम्ही चढणीने आधीच दमलेले त्यात अगदी शेजारी चाललेला हा प्रकार. ऐकू येणारी कु-कू ही कुठल्या प्राण्यांची आहे, हे एव्हाना चांगलंच कळून चुकलं होतं. गेली दोन वर्षे अनेक गावात आम्ही लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये या प्राण्यांच्या कळपाने वेळोवेळी दर्शन दिले होते.

तेवढ्यात सांबराची किंकाळी ऐकू आली आणि हालचाल कमी झाली. आम्ही टवकारलेले कान सावरून थोडं पुढे जाऊन कानोसा घ्यावा का, या विचारात मग्न होतो. कारण, ही सर्व धडपड हळूहळू आम्ही चढत असलेल्या पायऱ्यांच्या दिशेने सरकत होती आणि आमच्या अस्तित्वाची कल्पना या सर्वांना नसणार याची जाणीव आम्हालासुद्धा होती. त्यामुळे एक मन इथेच दबा धरून बसू आणि वाट पाहू म्हणत होती तर दुसरे मन मात्र इथून पळ काढून देवळाच्या पलीकडे लावलेल्या गाडीमध्ये सहारा घेण्याच्या बाजूने होते; परंतु हे दोन्ही चॉईस अचानक संपले आणि पायऱ्या संपताच समोर असलेल्या अंगणाच्या पलीकडे जाळीत घुसण्याचा प्रयत्न करणारे सांबर आणि त्याचा पाठलाग करणाऱ्या रानकुत्र्यामध्ये आपण दोघं उभे आहोत, या जाणिवेने आम्ही जागीच थिजलो.

Sambar
कृष्णाची जीवनगीता! 'मुंबादेवीने ती पोर माझ्या संगती पाठवली नसती, तर मी आज बी मुंबईतच असतो'

रानकुत्र्याविषयी आतापर्यंत ऐकलेल्या वाचलेल्या सर्व कथा, गोष्टी क्षणार्धात डोळ्यासमोरून तळरून गेल्या. यांच्या शिकार करण्याच्या पद्धती, प्रसंगी वाघालासुद्धा न घाबरण्याची निडर वृत्ती आणि कळपाचे सामर्थ्य यामुळे बेडर असलेला या प्राण्यांच्या शिकार मिळवण्याच्या मार्गात आम्ही दोघे थिजून उभे होतो. आम्ही जे काय होईल ते पाहूया या मोडवर थरथरणारे हातात कॅमेरा सेट करून उभे होतो.

रानकुत्र्याचे कळप बाजूला असणार, या भीतीने आमची हालचालसुद्धा थिजली होती. मग सुरू झाला तो वाट बघण्याचा काळ. खरंतर, अशी वेळ ही मानसिक आंदोलनाची असते. गलितगात्र होत आलेल्या त्या पिल्लाला पाणी तरी द्यावे, मोठंमोठे आवाज करून रानकुत्र्याच्या कळपाला हाकवून लावावे की इथून धाव घेऊन गाडी गाठावी आणि सरळ खालचे गाव गाठावे, असे अनेक विचार मनात येत होते. झुडपात येणारे आवाज ऐकून किती कुत्रे असावेत, याचा अंदाज बांधणे पण एका कानाने सुरू होते. असाच अर्धा तास निघून गेला. कदाचित कुत्र्यांना आमचे अस्तित्व जाणवत असावे. हळूहळू आवाज थांबले. आम्ही जाऊन सांबर पाहिले. ते खूप धापावले तर होतेच; पण जखमीसुद्धा होते. आमच्याजवळ होत नव्हतं तेवढं पाणी त्याच्या अंगावर ओतणे एवढंच आम्हाला सुचत होतं. त्याने फारसा परिणाम झाला नाही. त्या सांबराने डोळ्यासमोरच या जगाचा निरोप घेतला.

Sambar
Health News : मुलांमधील स्थूलतेचा वाढता प्रकोप; कोणती आहेत कारणे, कशी घ्याल काळजी?

हतबल चेहऱ्याने आम्ही पुन्हा देवळात येऊन बसलो. बराच वेळ कोणीच आले नाही. झुडपात एका प्राण्यांचे दबकत सरकण्याचे आवाज येत होते; परंतु बाहेर कोणीच येत नव्हतं. शेवटी ट्रॅप कॅमेरा लावून तिथून जायचा बेत आम्ही ठरवला. एव्हाना तीन वाजले होते. नेटवर्क नाही आणि जंगलात येऊन झालेले पाच तास यामुळे घरून शोधाशोध सुरू होण्याआधी संपर्क कक्षेत पोहोचणे गरजेचे होते. जडवलेल्या मनाने तिथून निघालो. ट्रॅप कॅमेऱ्यामुळे पुढे काय घडणार, हे कळेल याची शाश्वती होती; परंतु बॅटरी कमी होती म्हणून परत एकदा संध्याकाळी येऊन बघावं लागणार होते तसेच कोणी माणसे किंवा कामगार इथे फिरकले तर मग काहीच मिळणार नाही याची भिती होती म्हणून काळोख पडण्याआधी परत आलो.

कॅमेरा अगदी उत्साहाने धावत जाऊनच काढला. कारण, समोर सांबर खाल्लेलं दिसत होतं. त्याची आतडी बाहेर ओढून काढलेली होती. पोटाकडून फाडून आतलं मांस खाल्लेल दिसत होतं. लॅपटॉपमध्ये पहिलाच रानकुत्रा दिसला आणि मन शांत झालं. शेवटी जिवो जिवस्य जीवनम नियम असलेल्या शिकारीत आम्ही मध्येच टपकलो होतो. सांबर तर वाचवू शकत नव्हतो मग कमीत कमी ज्याने शिकार केली त्याच्या तोंडी तरी ती लागावी, अशीच भावना आमची होती. ती साध्य झाल्याचं दिसतं होत.

Sambar
खाडीत लालभडक उगवता सूर्य, मगरीने भरलेले जगबुडीचे खोरे अन् बरंच काही; मालदोलीत असं नेमकं आहे तरी काय?

आता सकाळी पुन्हा माणसे यायच्या यात कॅमेरा घेऊन जाऊ, असे ठरवून आम्ही घरी आलो. डुक्कर, बिबट्या सहज दिसणाऱ्या भागात असल्यामुळे रात्री खूप काही घडणार याची खात्री होती तश्या भरात जाऊन कॅमेरा चेक केला तर १३० व्हिडिओ आले होते; पण सगळे काळे. इन्फ्रारेडने दगा दिला होता. संध्याकाळी ७ ते अगदी पहाटे ५ पर्यंत अनेक व्हिडिओ रेकॉर्ड झाले होते; परंतु डार्क. आता काहीच कळणार नव्हतं. ज्या तंत्रज्ञानाने एवढी चित्रे दिले तेच ही कहाणी अपूर्ण राहण्यात हातभार ठरलं होतं. तसंही प्रत्येक गोष्टीला सुखांत नसतोच.

(लेखक निसर्ग अभ्यासक आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com